
मागच्या वर्षीचा ऑक्टोबर – नोव्हेंबरचा महिना असावा .. पाऊस तसा पूर्णपणे उघडलेला , मध्येच कधीतरी नवरात्रात एक शिडकावा करून गेलेला . आम्हा जिममधल्या मैत्रिणींचं नुकतंच नवरात्रात दांडियाला घागरा- चोळी घालून नटण – मुरडण , डाएट थोडंसं बाजूला सारून गोड खाणं, हे अंमळ जरा जास्त झालं होतं . दिवाळीला थोडा अवकाश होता , म्हणून वाढलेले वजनी पौंड राहिलेलया दिवसांत जरा कमी करण्यासाठी आम्ही नियमित जिमच्या वाऱ्या करत होतोच . त्यात ट्रेनरने आम्हा मैत्रिणींच्या त्रिकुटाला , वर्कआउट आणि डाएट शिस्तीत पाळायची तंबी दिली होती !…





