काही वर्षांपूर्वी कोणी जर पॅनकेक म्हटले तर मला अगदी उत्सुकता वाटायची आणि त्या व्यक्तीचे कौतुकही, की अरे वा.. काय माहिती आहे याला ग्लोबल cuisine ची!!
असाच माझा एक जूनियर colleague होता केरळचा , त्याच्याशी संभाषण 80 % इंग्रजी आणि 15 % हिंदी मधून व्हायचे आणि जेव्हा प्रॉजेक्टची डेडलाइन तोंडावर आली की बाकीच्या 5 % संभाषणासाठी आपोआप जीभ मराठीत वळायची !अहो चिडचिड करताना आणि झोपेत माणूस मातृभाषेतच बोलतो, आठवली का तेनाली रामाची गोष्ट! असो तर गोष्ट अशी घडली की तो 2 आठवड्याच्या सुट्टी नंतर केरळ वरुन आला आणि त्याच्या आईने प्रेमाने दिलेला डबा खाण्यासाठी आम्ही सरसावलो. त्याने सांगितले होते की त्याने स्वीट पॅनकेक्स आणलेयत केरळ स्पेशल!! . माझी उत्सुकता शिगेला पोचलेली आणि डबा उघडताच पाहतो तर काय , छान लुसलुशित गोड अप्पम आणले होते त्याने की ज्याच्या बॅटर मधे अंड वापरले होते. एक टपली मारत त्याला मी हसत म्हटले , “अरे.. अप्पम म्हटले असते तरी समजले असते आणि ज्याला नाही समजले असते तिथे ती तुझी जबाब दारी आहे की लोकांना तुझ्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीची ओळख करून द्यायची”! हसून मान डोलावली त्याने!
मला वैयक्तिक रित्या असे खरच वाटते की जमाना ग्लोबल cuisine चा आहे, आणि जसे आपण विदेशी खाद्य संस्कृती मोठ्या मनाने स्वीकारली आहे तसच आपली ही खाद्य संस्कृती जगासमोर आणायला काहीच हरकत नाही त्यांच्या मूळ नावांसहित!
गुलाब जामून चे “गुलाब जामून ” हे नाव तितकेच महत्त्वाचे आहे जेव्हा सगळ्यांना कळावे म्हणून आपणच त्याला सोफिस्टीकेटेड “ इंडियन फ्राइड स्वीट डोनट” असे नाव देऊन गुलाबजामून या शब्दाचा उल्लेख टाळतो . मालपुआ म्हणण्यात जी आत्मियता आहे ती “ इंडियन स्वीट पॅनकेक डिप्ड इन शुगर सिरप “ म्हणण्यात जाणवत नाही!!
असच या रेसिपी च्या बाबतीत घडले. पोटॅटो पॅनकेक ही एक क्लास्सीक रेसिपी आहे जीचा ज्यूयिश इतिहासात उल्लेख आहे. Hannukah फेस्टिवल दरम्यान ती बनवली जाते. मूळ पोटॅटो पॅनकेक्स मधे अंडे आणि काळी मिरी पावडर वापरली जाते. ही खरच इतकी चांगली नाष्टयाची आणि डब्याची रेसिपी आहे की ती आपण आपले लोकल इंग्रीडियेंट्स वापरुन बनवू शकतो. जे लोक अंडे खातात ते अंडे घालू शकतात आणि शाकाहारींसाठी आपण डाळीचे पीठ किंवा तांदळाचे पीठ वापरु शकतो.
आता ह्या साध्या सोप्या पॅनकेकला उगाचच आलू का चीला वगैरे म्हणणे मला नाही पटत कारण खाद्यपदार्थांमधे लोकल आणि सीज़नल इंग्रीडियेंट्स वापरुन आपण आपले पाक कौशल्य नक्की दाखवावे परंतु नावांचे “भारतीयकरण “ किंवा आंगलळिकारण करू नये असएक खाद्य प्रेमी म्हणून मला खरच वाटते.
तर बच्चे पार्टी च्या शाळा सुरू झाल्यात, घ्या ही एक छान आणि झटपट रेसिपी तुमच्या चिमण्यांच्या डब्यासाठी!
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
Prep time:
Cook time:
Total time:
- 2 मोठे बटाटे = 300 ग्रॅम , सोलून आणि धूऊन
- 1 लहान कांदा = 60 ग्रॅम बारीक चिरलेला
- 2 टेबल स्पून मैदा
- 1 अंडे
- 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
- मीठ चवीप्रमाणे
- 2 टेबल स्पून कोथिंबीर बारीक चिरून
- तेल
- 2-3 टेबल स्पून बेसन ( फक्त शाकाहारी पॅनकेक्स साठी )
- किसणीच्या साहाय्याने बटाटे किसून घ्यावे , शक्यतो मध्यम आकाराच्या किसणीच्या दातांनी बटाटे किसावेत. आणि हे किसलेले बटाटे बर्फ घातलेल्या थंड पाण्यात बुडवून ठेवावेत. यामुळे बटाटे काळे पडत नाहीत आणि बटाट्यांचा स्टार्चही धूऊन निघतो. 5 मिनिटांसाठी बटाटे असेच पाण्यात ठेवावेत.
- मिनिटांनंतर बटाटे पाण्यातून काढून चाळणीत निथळत ठेवावे. एक्सट्रा स्टार्च निघून गेल्याने पॅनकेक्स चिकट न होता एकदम कुरकुरीत होतात.
- आता आपण पॅनकेकचे मिश्रण बनवून घेऊ ज्यात आपण अंड वापरणार आहोत. एका मोठ्या खोलगट भांड्यात किसलेले बटाटे घालून घेऊ. त्यातच चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या , चिरलेली कोथिंबीर, मैदा, चवीप्रमाणे मीठ आणि 1 अंड फोडून घालू आणि एकत्र मिसळून घेऊ.
- हे मिश्रण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवू आणि शाकाहारी पॅनकेक साठी मिश्रण बनवून घेऊ. त्यासाठी दूसरया भांड्यात किसलेले बटाटे , चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर , मैदा , मीठ आणि अंड्याऐवजी यात आपण 3 टेबलस्पून बेसन घालून एकत्र मिसळून घेऊ. शाकाहारी पॅनकेक्स चे मिश्रण तयार आहे आणि आपण ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवू. तोपर्यंत अंडे घातलेल्या मिश्रणाचे पॅनकेक्स तव्यावर घालून घेऊ.
- एका नॉनस्टिक तव्यात 1 टेबल स्पून तेल गरम करून घेऊ. तेल तापले की आच मंद करावी आणि त्यात 1-2 चमचे मिश्रण घालू. हे मिश्रण चमच्याने दाबून एक सारखे करून घ्यावे . मंद आचेवर चांगले शिजू द्यावे.
- एका बाजूने पॅनकेक आपण दीड मिनिट शिजवून घेतले आहे. जशा पॅनकेक्स च्या कडा खरपूस रंगावर आल्या की पॅनकेक उलटून घेऊ. दूसर्या बाजूने ही खरपूस भाजून घेऊ.
- अशाच प्रकारे शाकाहारी पॅनकेक्सही बनवून घेऊ.
- या मापा मधे 6 ते 8 पॅनकेक्स बनतात. मिश्रण आदल्या दिवशी बनवून फ्रीज मधे ठेवले तर सकाळच्या घाईत पटकन होतात हे पॅनकेक्स!
Leave a Reply