कोकणी खाद्यसंस्कृतीत कडधान्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे . रोजच्या जेवणात तोणाक , उसळ , आमटी किंवा सांबार असल्याशिवाय घास घशाखाली उतरेल तर शप्पथ ! लहानपणापासून आमच्या घरी महिन्याचा किराणा वेगळा आणि ३-४ महिन्यांना पुरेल इतके कडधान्ये वेगळे असे भरले जायचे . मूग, मटकी , काळे चणे , पांढरे वाटाणे , हिरवे वाटाणे , काळे वाटाणे , काबुली चणे , चवळी ( जाड , बारीक दोन्ही ) , राजमा , पावटा , कुळीथ आणि कडवे वाला चा तर विचारू नका वेगळाच थाट मांडला जायचा ! ही सगळी कडधान्ये व्यवस्थित निवडून डब्यांत कडुलिंबाच्या पाल्यासकट भरली जायची , कीड लागू नये म्हणून !
आमच्याकडे अगदी लहान असल्यापासूनच कडधान्ये आणि मासे खायची पोरांना आपोआप सवय लागते , आयांना कष्ट घ्यावे लागतच नाहीत ! अर्थात मी ही त्याला अपवाद नव्हते .
मला मात्र हे कुतूहल नेहमी असायचे की काळ्याभोर इवल्या वाटाण्याला आजीसारखा पांढरा लांबलचक केस येतो कुठून ? माझे हे कोडे नंतर उलगडले जेव्हा प्राथमिक शाळेत परिसर अभ्यासाच्या बाईंनी रोपे लावून आणण्याची स्पर्धा ठेवली . आईने मस्तपैकी वाल पेरून दिले आणि इतकी सुंदर घनदाट रोपटी आली होती ना माझ्या त्या वारणा श्रीखंडाच्या पसरट प्लॅस्टिकच्या भांड्यात ! बाईंनी सगळ्या वर्गासमोर शाबासकी देत बक्षीसही दिले होते !
आजचा माझा ब्लॉग हा पूर्णतः स्वयंपाकासाठी कराव्या लागणाऱ्या पूर्वतयारीत मोडणारा , आज मी कडधान्याला मोड आणण्याच्या पद्धती तसेच ते जास्त दिवस फ्रिजमध्ये कसे साठवून ठेवावे यासंबंधी लिहिणार आहे .
मटकी भिजवण्याआधी स्वच्छ निवडून घ्यावी . कधी कधी मटकीत बारीक खडे आढळतात . नंतर एका पातेल्यात मटकी स्वच्छ धुऊन ती बुडेल इतके पाणी घालावे .
पातेले झाकून ८ ते १० तासांसाठी मटकी भिजू द्यावी .
दहा तासांनी मटकी पाण्यात चांगली भिजून फुगते .
ही मटकी एका चाळणीत काढून तिचे जास्तीचे पाणी खाली निथळू द्यावे.
साधारण १० मिनिटांत पाणी निथळल्यावर अर्धी मटकी एका सुती पातळ कापडात गच्च बांधून गाठोडे बांधावे . हे गाठोडे एका पातेलीत ठेवून वर चलन झाकण ठेवावी म्हणजे हवा खेळती राहते . स्वयंपाकघरात जराशा उबदार जागी २४ तासांसाठी हे पातेले ठेवावे .
मटकीला मोड काढण्याची दुसरी पद्धत ही हिवाळ्यासाठी जास्त उपयोगी आहे . मायक्रोवेव्ह ओव्हन हाय पॉवर वर २ मिनिटे गरम करून घ्यावा . मटकी एका चाळणीत काढून त्याखाली एक पातेले ठेवावे आणि हे पातेले ओव्हन मध्ये ठेवावे . ओव्हनचा मेन स्विच बंद करावा .
२४ तासांनंतर छान मटकीला मोड येतात. आपण त्वरित ही मटकी वापरू शकतो किंवा फ्रिजमध्ये ठेवू शकतो .
फ्रिजमध्ये स्टोर करण्यापूर्वी मटकी पूर्ण कोरडी असावी , ओलसरपणा नसावा . एका प्लॅस्टिकच्या किंवा स्टीलच्या हवाबंद डब्यात किचन वापराचा टिश्यू पेपर पसरवून त्यावर मटकी भरावी . डबा बंद करून फ्रिजमध्ये ठेवावा .
मोड आलेले कडधान्य असे फ्रिजमध्ये १०-१२ दिवस आरामात टिकते. वाटल्यास मध्ये मध्ये टिश्यू पेपर बदलावा . जर हे कडधान्य २ आठवड्यांपेक्षा जास्त दिवस टिकवायचे असेल तर डीप फ्रिजमध्ये ठेवावे .

- २५० ग्रॅम्स मटकी
- पाणी
- चाळणी
- मोठे पातेले
- मटकी भिजवण्याआधी स्वच्छ निवडून घ्यावी . कधी कधी मटकीत बारीक खडे आढळतात . नंतर एका पातेल्यात मटकी स्वच्छ धुऊन ती बुडेल इतके पाणी घालावे . पातेले झाकून ८ ते १० तासांसाठी मटकी भिजू द्यावी .
- दहा तासांनी मटकी पाण्यात चांगली भिजून फुगते .
- ही मटकी एका चाळणीत काढून तिचे जास्तीचे पाणी खाली निथळू द्यावे.
- साधारण १० मिनिटांत पाणी निथळल्यावर अर्धी मटकी एका सुती पातळ कापडात गच्च बांधून गाठोडे बांधावे . हे गाठोडे एका पातेलीत ठेवून वर चलन झाकण ठेवावी म्हणजे हवा खेळती राहते . स्वयंपाकघरात जराशा उबदार जागी २४ तासांसाठी हे पातेले ठेवावे .
- मटकीला मोड काढण्याची दुसरी पद्धत ही हिवाळ्यासाठी जास्त उपयोगी आहे . मायक्रोवेव्ह ओव्हन हाय पॉवर वर २ मिनिटे गरम करून घ्यावा . मटकी एका चाळणीत काढून त्याखाली एक पातेले ठेवावे आणि हे पातेले ओव्हन मध्ये ठेवावे . ओव्हनचा मेन स्विच बंद करावा .
- २४ तासांनंतर छान मटकीला मोड येतात. आपण त्वरित ही मटकी वापरू शकतो किंवा फ्रिजमध्ये ठेवू शकतो .
- फ्रिजमध्ये स्टोर करण्यापूर्वी मटकी पूर्ण कोरडी असावी , ओलसरपणा नसावा . एका प्लॅस्टिकच्या किंवा स्टीलच्या हवाबंद डब्यात किचन वापराचा टिश्यू पेपर पसरवून त्यावर मटकी भरावी . डबा बंद करून फ्रिजमध्ये ठेवावा .
- मोड आलेले कडधान्य असे फ्रिजमध्ये १०-१२ दिवस आरामात टिकते. वाटल्यास मध्ये मध्ये टिश्यू पेपर बदलावा . जर हे कडधान्य २ आठवड्यांपेक्षा जास्त दिवस टिकवायचे असेल तर डीप फ्रिजमध्ये ठेवावे .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply