
मांसाहार प्रिय असणाऱ्या व्यक्तींना हॉटेलमध्ये काही स्टार्टर्स अतिशय प्रिय असतात , जसे तंदूरी चिकन हे भारतभर प्रिय ! तसेच इंडो चायनीज खाण्याचेही बरेच शॉकीन आहेत !
रस्तोरस्ती लागणाऱ्या या चायनीजच्या गाड्यांपासून ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये विस्तृत पसरलेल्या महागड्या बुफेमध्ये चायनीज स्टार्ट्स दिमाखात मिरवतात . आज मी तुमच्यासोबत चिकन लॉलिपॉप्स ची रेसिपी शेअर करणार आहे , हा पदार्थ तर माझ्या खूप आवडीचा , परंतु ही रेसिपी करण्यामागे अजून एक कारण आहे.

माझ्या हिंदी युट्यूब चॅनेलवर माझी एक लाडकी दर्शक – अश्विनी पुंड यांनी या रेसिपीची प्रेमळ रिक्वेस्ट केली होती. म्हणूनच आज आपण लहानथोरांपासून सर्वांची आवडती स्टार्टर रेसिपी चिकन लॉलीपॉप बनवणार आहोत .

अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा


- ११ चिकन लॉलिपॉप्स ( ३६० ग्रॅम्स )
- १ १/२ टेबलस्पून आले लसूण पेस्ट
- १/२ टीस्पून काळी मिरी जाडसर कुटून
- १ १/२ टीस्पून सोया सॉस
- १/२ टीस्पून व्हिनेगर
- चवीनुसार मीठ
- १/२ कप= ७० ग्रॅम्स मैदा
- ३ टेबलस्पून = ३० ग्रॅम्स कॉर्न फ्लोअर
- 1/२ टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
- १ अंडे
- ४-५ लसणीच्या पाकळ्या
- १/२ इंच आल्याच्या तुकडा बारीक चिरून
- १/४ कप कांद्याची पात बारीक चिरून
- १ टीस्पून रेड चिली सॉस
- १ १/२ टीस्पून शेझवान चटणी
- १ टीस्पून सोया सॉस
- ३ टेबलस्पून टोमॅटो केचअप
- तेल
- लॉलिपॉपच्या मॅरिनेशन साठी एका बाऊलमध्ये आले लसणाची पेस्ट, सोया सॉस, काळी मिरे पावडर, व्हिनेगर आणि थोडे मीठ घालून एकत्र करून घ्यावे.
- त्यात लॉलीपॉप घालून ३० ते ४० मिनिटे मॅरीनेट होऊ द्यावे.
- आता लॉलिपॉपच्या बाहेरील आवरणासाठी एका भांड्यात कॉर्नफ्लोअर , मैदा, लाल मिरची पूड, आणि थोडे मीठ घालून घ्यावे. एक अंडे फोडून घालावे.
- हे मिश्रण साधारण ३/४ कप पाणी घालून चांगले फेटून घ्यावे. हे मिश्रण कोट होईल इतपतच पातळ करावे .
- लॉलिपॉप मॅरीनेट झाल्यावर एका कढईत तेल घालून माध्यम आचेवर गरम होऊ द्यावे. लॉलिपॉप्स एकेक करून बॅटर मध्ये नीट घोळवून गरम तेलात मंद ते मध्यम आचेवर ३-४ मिनिटे सोनेरी रंगावर तळून घ्यावे.
- लॉलिपॉप्स तळून झाले की आपण सॉस बनवून घेऊ. काही लॉलिपॉप्स आपण सॉसमध्ये टॉस केल्याशिवायच सर्व करू . आणि बाकीचे सॉसमध्ये टॉस करू.
- सॉस बनवण्यासाठी एका पॅन मध्ये २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात लसूण आणि आले घालून खरपूस होऊ देऊ. नंतर थोडी कांद्याची पात घालून थोडे नरम होऊ देऊ. आता रेड चिली सॉस, सोया सॉस, शेझवान चटणी , टोमॅटो केचअप , अगदी चुटकीभर मीठ घालून परतून घेऊ.
- २-३ टेबलस्पून पाणी घालून १- २ मिनिटे हा सॉस थोडा घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊ. आता त्यात तळलेले लॉलिपॉप्स घालून सॉस ने नीट कोट करून घेऊ.
- गरम गरम लॉलिपॉप्स शेझवान चटणी किंवा टोमॅटो केचअप सोबत वाढावे.
Mam, i love your recipes
Thanks Tejashree for your wonderful feedback ! Keep reading, enjoy cooking!