चिकन लॉलीपॉप - Chicken Lollipop recipe in Marathi- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Snack
 
Ingredients
तयारीसाठी वेळ: ४५ मिनिटे
बनवण्यास वेळ : १५ मिनिटे
कितीजणांसाठी बनेल : ४ ते ५
साहित्य:
 • ११ चिकन लॉलिपॉप्स ( ३६० ग्रॅम्स )
 • १ १/२ टेबलस्पून आले लसूण पेस्ट
 • १/२ टीस्पून काळी मिरी जाडसर कुटून
 • १ १/२ टीस्पून सोया सॉस
 • १/२ टीस्पून व्हिनेगर
 • चवीनुसार मीठ
 • १/२ कप= ७० ग्रॅम्स मैदा
 • ३ टेबलस्पून = ३० ग्रॅम्स कॉर्न फ्लोअर
 • 1/२ टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
 • १ अंडे
 • ४-५ लसणीच्या पाकळ्या
 • १/२ इंच आल्याच्या तुकडा बारीक चिरून
 • १/४ कप कांद्याची पात बारीक चिरून
 • १ टीस्पून रेड चिली सॉस
 • १ १/२ टीस्पून शेझवान चटणी
 • १ टीस्पून सोया सॉस
 • ३ टेबलस्पून टोमॅटो केचअप
 • तेल
Instructions
कृती :
 1. लॉलिपॉपच्या मॅरिनेशन साठी एका बाऊलमध्ये आले लसणाची पेस्ट, सोया सॉस, काळी मिरे पावडर, व्हिनेगर आणि थोडे मीठ घालून एकत्र करून घ्यावे.
 2. त्यात लॉलीपॉप घालून ३० ते ४० मिनिटे मॅरीनेट होऊ द्यावे.
 3. आता लॉलिपॉपच्या बाहेरील आवरणासाठी एका भांड्यात कॉर्नफ्लोअर , मैदा, लाल मिरची पूड, आणि थोडे मीठ घालून घ्यावे. एक अंडे फोडून घालावे.
 4. हे मिश्रण साधारण ३/४ कप पाणी घालून चांगले फेटून घ्यावे. हे मिश्रण कोट होईल इतपतच पातळ करावे .
 5. लॉलिपॉप मॅरीनेट झाल्यावर एका कढईत तेल घालून माध्यम आचेवर गरम होऊ द्यावे. लॉलिपॉप्स एकेक करून बॅटर मध्ये नीट घोळवून गरम तेलात मंद ते मध्यम आचेवर ३-४ मिनिटे सोनेरी रंगावर तळून घ्यावे.
 6. लॉलिपॉप्स तळून झाले की आपण सॉस बनवून घेऊ. काही लॉलिपॉप्स आपण सॉसमध्ये टॉस केल्याशिवायच सर्व करू . आणि बाकीचे सॉसमध्ये टॉस करू.
 7. सॉस बनवण्यासाठी एका पॅन मध्ये २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात लसूण आणि आले घालून खरपूस होऊ देऊ. नंतर थोडी कांद्याची पात घालून थोडे नरम होऊ देऊ. आता रेड चिली सॉस, सोया सॉस, शेझवान चटणी , टोमॅटो केचअप , अगदी चुटकीभर मीठ घालून परतून घेऊ.
 8. २-३ टेबलस्पून पाणी घालून १- २ मिनिटे हा सॉस थोडा घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊ. आता त्यात तळलेले लॉलिपॉप्स घालून सॉस ने नीट कोट करून घेऊ.
 9. गरम गरम लॉलिपॉप्स शेझवान चटणी किंवा टोमॅटो केचअप सोबत वाढावे.
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/chicken-lollipop-recipe-in-marathi-kali-mirch-by-smita/