माझ्या आईची आई म्हणजे माझी प्रिय आज्जी सुगरण , तसे देवाने या आज्ज्यांच्या रूपात अन्नपूर्णेचीच रूपे पृथ्वीतलावर धाडली असेच वाटते मला ! माझ्या आईने सुद्धा तिच्याकडून पाककला शिकून आपला सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब सांभाळत सगळे साग्रसंगीत करायची सवय अंगी बाणवली !
मग तो दिवाळीचा फराळ असो की मकरसंक्रांतीचे हळदीकुंकू ! उन्हाळा सुरु झाला की माझी वार्षिक परीक्षा कधी संपतेय याकडे आजी आणि आईचेच जास्त लक्ष असायचे , कारण वर्षभराचे मसाले , लोणची , पापड , सांडगे यांचे बेत सुरु व्हायचे . तेसुद्धा आईचे नोकरीचे शेड्युल सांभाळून ..
आजची माझी ही लोणच्याची पाककृती माझ्या आजीने आईला शिकवलेली आणि आता तिच्याकडून हे गृह्य संस्कारांचे वाण माझ्या पदरी आलेय ,आणि हौसेने , अत्यानंदाने आज मी तुमच्यासोबत माझ हे वाण लुटणार आहे ! अगदी साधी सोप्पी मिरच्यांच्या लोणच्याची रेसिपी आहे , परंतु ती करताना आणि आता लिहिताना त्या लोणच्यासोबत मिटक्या मारत खाल्लेला ताक भात , त्याचे बोटांवरचे ओघळ चाटतानाचे बालपणातले दिवस , सर्र्कन डोळ्यांसमोरून तरळून गेले .
नक्की वाचा हे रेसिपी
सगळ्यात पहिल्यांदा खडे मीठ मंद आचेवर तव्यात हलके भाजून घ्यावे. थंड झाले की मिक्सरमधून दरदरीत पावडर करून घ्यावी
- अशाच प्रकारे पिवळ्या मोहरीची ( न भाजता ) मिक्सरमधून जाडसर पावडर करून घ्यावी . तुमच्याकडे पिवळ्या मोहरीची डाळ असेल तर हे करायची गरज नाही . पिवळी मोहरी नाही मिळाली तर नेहमीच्या काळ्या मोहरीची अशीच मिक्सरमधून फिरवून जाडसर पावडर वापरावी !
- याच पद्धतीने मेथीसुद्धा ( न भाजता ) जाडसर फिरवून घ्यावी
- मिरच्यांना स्वच्छ धुऊन त्यांचे देठ काढून घ्यावेत . डागाळलेल्या , मऊ झालेल्या मिरच्या किंवा तुकडे पडलेल्या मिरच्या वापरू नयेत . नंतर या मिरच्यांना स्वच्छ कापडावर पसरून पुसून घ्यावे . पाण्याचा अंश राहू देऊ नये . देठं काढल्यावर साधारण मिरच्यांचे वजन ४५० ग्रॅम होते .
- मिरच्या पूर्ण कोरड्या झाल्या की त्यांना सुरीने मधोमध लांब चिरून एका मिरचीचे साधारण १ इंच लांबीचे तुकडे करावेत .
- या मिरच्यांच्या तुकड्यांना १ टीस्पून हळद आणि १ टीस्पून हिंग चोळून घ्यावे .
- नंतर एका कढईत साधारण अर्धा कप तेल चांगले गरम करून घ्यावे .
- तेल जरासे थंड होऊ द्यावे म्हणजे हाताला चटका बसणार नाही इतपत थंड होऊ द्यावे . ४-५ टेबलस्पून तेल एका मोठया परातीत घ्यावे . त्यात मोहरीची पावडर आणि उरलेले हिंग घालावे .
- फोटोत दाखवल्याप्रमाणे हाताच्या तळव्याने जोर देऊन हिंग आणि मोहरी तेलात चांगली फेसून घ्यावी . साधारण ५-६ मिनिटे ही क्रिया करावी म्हणजे मोहरी चांगली चढते आणि नाकाला तिचा सुवास जाणवायला लागतो .
- नंतर त्यात उरलेली हळद, मेथी पावडर आणि मीठ घालावे . हे देखील हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्यावे . हा जो लोणच्याचा मसाला तयार होतो त्याचा सुगंध शब्दांत वर्णन न करता येण्यासारखा !
- नंतर या मसाल्यात मिरच्या घालाव्यात आणि नीट एकत्र करून घ्याव्यात .
- एक स्वच्छ बरणी घ्यावी . तिला आतून बाहेरून स्वच्छ फडक्याने दाबून पुसावी , अगदी झाकण आणि कड्या सुद्धा ! पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे . या बरणीत लोणचे भरावे .
- नंतर लिंबाचा रस एका वाटीत काढून घ्यावा . हा रस वरून लोणच्यात ओतावा .
- झाकण घट्ट बंद करून ही बरणी फडताळात किंवा जिकडे कोणाचा वावर नसेल त्या जागी किमान ४-५ तासांसाठी ठेवावी . वरून धूळ किंवा तत्सम काही चिकटू नये म्हणून स्वच्छ कापडात गुंडाळलीत तरी चालेल.
- ४-५ तासांनंतर साधारण १ ते दीड कप तेल चांगले गरम करावे . तेल अगदी कोमट किंवा थंड होऊ द्यावे . हे तेल वरून लोणच्यात घालावे . तेल इतके घालावे की मिरच्यांचा वरचा भाग तेलात पूर्ण बुडाला पाहिजे . असे केले तर लोणच्याला बुरशी लागत नाही .
- नंतर ही बरणी परत स्वच्छ कापडात गुंडाळून एका बाजूला ठेवावी . साधारण आठवड्या भरात हे लोणचे खायला तयार होते .
- हिरव्या मिरच्या पोपटी किंवा जराशा गर्द हिरव्या रंगाच्या ( काळपट हिरव्या घेऊ नयेत ते लोणचे राकट लागते चवीला ) - ५०० ग्रॅम्स ,
- ५ लिंबाचा रस ( साधारण अर्धा कप ),
- पिवळी मोहरी किंवा पिवळ्या मोहरीची डाळ ४- ५ टेबलस्पून ( ५० ग्रॅम ),
- हळद दीड टेबलस्पून ( १५ ग्रॅम ) ,
- मेथी दाणे एक टेबलस्पून ( १५ ग्रॅम ) ,
- हिंग ३ टेबलस्पून ( ३० ग्रॅम ) ,
- खडे मीठ ५ टेबलस्पून ( १२५ ग्रॅम ) ,
- तेल ( शेंगदाणा किंवा सूर्यफूल ) दीड ते २ कप
- सगळ्यात पहिल्यांदा खडे मीठ मंद आचेवर तव्यात हलके भाजून घ्यावे. थंड झाले की मिक्सरमधून दरदरीत पावडर करून घ्यावी .
- अशाच प्रकारे पिवळ्या मोहरीची ( न भाजता ) मिक्सरमधून जाडसर पावडर करून घ्यावी . तुमच्याकडे पिवळ्या मोहरीची डाळ असेल तर हे करायची गरज नाही . पिवळी मोहरी नाही मिळाली तर नेहमीच्या काळ्या मोहरीची अशीच मिक्सरमधून फिरवून जाडसर पावडर वापरावी !
- याच पद्धतीने मेथीसुद्धा ( न भाजता ) जाडसर फिरवून घ्यावी .
- मिरच्यांना स्वच्छ धुऊन त्यांचे देठ काढून घ्यावेत . डागाळलेल्या , मऊ झालेल्या मिरच्या किंवा तुकडे पडलेल्या मिरच्या वापरू नयेत . नंतर या मिरच्यांना स्वच्छ कापडावर पसरून पुसून घ्यावे . पाण्याचा अंश राहू देऊ नये . देठं काढल्यावर साधारण मिरच्यांचे वजन ४५० ग्रॅम होते .
- मिरच्या पूर्ण कोरड्या झाल्या की त्यांना सुरीने मधोमध लांब चिरून एका मिरचीचे साधारण १ इंच लांबीचे तुकडे करावेत .
- या मिरच्यांच्या तुकड्यांना १ टीस्पून हळद आणि १ टीस्पून हिंग चोळून घ्यावे .
- नंतर एका कढईत साधारण अर्धा कप तेल चांगले गरम करून घ्यावे .
- तेल जरासे थंड होऊ द्यावे म्हणजे हाताला चटका बसणार नाही इतपत थंड होऊ द्यावे . ४-५ टेबलस्पून तेल एका मोठया परातीत घ्यावे . त्यात मोहरीची पावडर आणि उरलेले हिंग घालावे .
- फोटोत दाखवल्याप्रमाणे हाताच्या तळव्याने जोर देऊन हिंग आणि मोहरी तेलात चांगली फेसून घ्यावी . साधारण ५-६ मिनिटे ही क्रिया करावी म्हणजे मोहरी चांगली चढते आणि नाकाला तिचा सुवास जाणवायला लागतो .
- नंतर त्यात उरलेली हळद, मेथी पावडर आणि मीठ घालावे . हे देखील हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्यावे . हा जो लोणच्याचा मसाला तयार होतो त्याचा सुगंध शब्दांत वर्णन न करता येण्यासारखा !
- नंतर या मसाल्यात मिरच्या घालाव्यात आणि नीट एकत्र करून घ्याव्यात .
- एक स्वच्छ बरणी घ्यावी . तिला आतून बाहेरून स्वच्छ फडक्याने दाबून पुसावी , अगदी झाकण आणि कड्या सुद्धा ! पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे . या बरणीत लोणचे भरावे .
- नंतर लिंबाचा रस एका वाटीत काढून घ्यावा . हा रस वरून लोणच्यात ओतावा .
- झाकण घट्ट बंद करून ही बरणी फडताळात किंवा जिकडे कोणाचा वावर नसेल त्या जागी किमान ४-५ तासांसाठी ठेवावी . वरून धूळ किंवा तत्सम काही चिकटू नये म्हणून स्वच्छ कापडात गुंडाळलीत तरी चालेल.
- ४-५ तासांनंतर साधारण १ ते दीड कप तेल चांगले गरम करावे . तेल अगदी कोमट किंवा थंड होऊ द्यावे . हे तेल वरून लोणच्यात घालावे . तेल इतके घालावे की मिरच्यांचा वरचा भाग तेलात पूर्ण बुडाला पाहिजे . असे केले तर लोणच्याला बुरशी लागत नाही .
- नंतर ही बरणी परत स्वच्छ कापडात गुंडाळून एका बाजूला ठेवावी . साधारण आठवड्या भरात हे लोणचे खायला तयार होते .
Superb recipes
Thanks a lot dear 🙂
Thank s smita didi, ur green chilli pickle recipe is amazing… Could you also share aagri koli dry masala powder , and malvani masala recipe if possiblee
Hi Rashmi Thanks a lot ! Kindly check all the recipes on my blogsite . Not all are in Marathi but English it do exist 🙂