उन्हाळा आणि आंबा ह्या दोन गोष्टी एका मराठी कुटुंबात समानार्थी मानल्या जातात , म्हणजे मला असे वाटते हो , जरा कुठे फेब्रुवारी संपतोय , तर रोजच्या बाजारहाटाला जातानासुद्धा , मंडईत आंब्याच्या चौकशा सुरु होतात .
आमच्याकडे गुढीपाडव्याला पहिला आंबा नैवेद्यात दाखवायची प्रथा आहे , आणि आम्रखंड व पुरी ठरलेली ! आंबा हा आंबा असतो , म्हणजे हापूसच्या भरगच्च फोडी , रायवळचे बिटके , तोतापुरीचा निमुळता शेंडा , बदामी आंब्याची ही भली मोठी फोड सगळे इतके आकर्षित करते की खर सांगू मला राहवतच नाही , माझ्याकडे आंब्याचे पदार्थ बनवायचे म्हटले की आंबे ऐन वेळी उरत नाही , ते आल्या आल्या फस्त होतात . दिवाणे पन काय असते ते कळायला एकदा मला नी माझ्या मामे – मावस भावंडांना आंबे खाताना पाहायला हवे ,असं आमच्या घरात म्हटले जाते .
आता आम्ही सगळ्यांनी वयाची तिशी ओलांडली तरीही गावी आमच्या मामी, मामा ,मावशी मंडळी लहानपणीच्या आठवणी रंगवून रंगवून सांगतात !तर आंब्यांच्या आठवणींचा मुरंबा कधी नंतर तुमच्यासोबत चाखिन , आज लवकर घाई यासाठी करतेय की अहो पाऊस थडकलाय , आंबे आता कमी होतील मिळायचे , हे मी हापूस विषयी बोलतेय .. लवकर घ्या नी बनवा हा अप्रतिम सोनसळी , मधुर , मऊसूत , तुपाळ आंब्याचा शिरा … हाश धाप लागली मला , सगळी विशेषणे वापरली , कोणते राहिलेय का ? राहिले असॆल तर तुम्ही हा शिरा बनवा नी मला कंमेंट करून अभिप्राय कळवा!
Rating

- १ कप = २०० ग्रॅम्स बारीक रवा
- १ कप = २०० ml पाणी
- १ कप = २०० ml दूध
- १ कप = २०० ग्रॅम साजूक तूप
- १ टेबलस्पून बदामाचे पातळ काप
- १ टेबलस्पून काजूचे तुकडे
- १ टेबलस्पून चारोळी
- १ कप ताज्या आंब्याचा गर ( हापूस किंवा इतर कोणताही गोड आंबा )
- थोडे केशराचे धागे १ टेबलस्पून गरम दुधात भिजवून
- १ कप = २०० ग्रॅम साखर
- अर्धा कप आंब्याच्या बारीक फोडी
- पाव टीस्पून वेलची पावडर
- सर्वप्रथम रवा मंद आचेवर एकाच रंगावर भाजून घयावा . करपू देऊ नये .
- एका पातेल्यात दूध नी पाणी एकत्र करून उकळून घ्यावे . झाकण ठेऊन बाजूला ठेवावे .
- एका कढईत १-२ टेबलस्पून तूप गरम करावे . त्यातच बदामाचे काप , काजूचे तुकडे परतून घ्यावेत. जरासा रंग बदलला की त्यात चारोळी परतून घ्यावी .
- सुका मेवा एका ताटलीत काढून घ्यावा .
- त्याच कढईत उरलेलं तूप घालावे . त्यात भाजलेला रवा घालून नीट एकत्र करून घ्यावा . २-३ मिनिटे परतावा .
- नंतर आच मंद करून त्यात दूध नी पाण्याचे मिश्रण घालावे . झाकण घालून मंद आचेवर शिजू द्यावे .
- ३ मिनिटे शिजवल्यावर झाकण उघडून रवा नीट ढवळून घयावा . रव्यात गुठळी पडू देऊ नये .
- आता आंब्याचा रस आणि केशराचे दूध घालून नीट एकत्र ढवळून घ्यावे .
- साखर घालावी , आणि साखर विरघळेपर्यंत शिरा ढवळून घ्यावा .
- नंतर आंब्याच्या फोडी घालाव्यात , सुका मेवा व वेलची पावडर घालून एकत्र करावे .
- आंब्याचा अवीट चवीचा शिरा तयार !

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
This is an age of combos & multitasking. Unidimensionality is a passe. Smita ma’am writes so well & has her culinary skills to match. This is a heady combo! I love reading her articles as much as I like trying out her dishes (although, I am a hopeless cook). Please keep up the good work!
*अर्थात, मी वरील मजकूर मराठीत देखील लिहू शकलो असतो, पण तो जास्तीत जास्त लोकांना वाचता यावा हा उद्देश.
Dear Aditya , I really appreciate people who believe in appreciating others , and hence I am very happy and overwhelmed by your gesture . Its motivating and I would request you to visit my blog quite often and do provide your valuable feedback ! Thank you so much 🙂
Hello,
I come from sawantwadi and was really missing the recipes from my village there as I am currently in other country. But your website has it all. You are a fantastic cook and your recipes are great. Your passion is fantastic!
Regards,
Irum
Hey Its good to know a foodie from the same place where I belong to .. KONKAN.. 🙂
Your comment has just made my day friend .. I will definitely upload many more interesting recipes from our very own region 🙂
Keep supporting and happy cooking !