
उन्हाळा सुरु झाला रे झाला की माझ्या घरातल्या फडक्यात बांधून ठेवलेल्या चिनीमातीच्या बरण्या बाहेर निघतात . मग त्यांच्यात साग्रसंगीत रोजच्या रोज विरजण घालून दही बनवण्याचा माझा रोजचा दिनक्रम ठरलेला !
बाहेर रणरणते ऊन आणि उन्हाची काहिली शमवण्यासाठी फ्रिज निरनिराळ्या सरबतांनी, आईस क्रीम्सनी , कुल्फी आणि दह्या ताकाच्या बरण्यांनी भरून जातो- अर्थातच होममेड हे वेगळे सांगायला नकोच ! लस्सी ही माझी खूप आवडती , उन्हाळ्यात तसेही जेवण जास्त जात नाही , मी माझ्या लंच मध्ये एक ग्लास लस्सी आणि थोडे सॅलॅड बनवते ,बास एक डुलकी ठरलेली !

आता बाजारात हापूस यायला लागलाय , तर होऊन जाऊ दे आंब्याची लस्सी , काय म्हणताय ? हापूस नाही मिळाला तरी चालेल , कुठल्याही गोड आंब्याचा गर वापरलात तरी चालेल ! या लस्सीला मी अजून थोडा रिच टच दिलाय , कसा ते , रेसिपी वाचल्यावर कळेलच तुम्हाला !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
Read this recipe in English


- १ कप = २५० ग्रॅम्स आंब्याचा गर ( हापूस किंवा इतर कुठलाही गोड आंबा )
- १ कप = २०० ग्रॅम्स घट्ट दही
- २-३ टेबलस्पून दूध
- २ टीस्पून साखर ( आंब्याच्या गोडव्यानुसार साखर कमी जास्त वापरावी )
- काजू, बदाम आणि पिस्त्याची कुटून जाडसर पावडर
- १/४ टीस्पून वेलची पावडर
- मलई बर्फीचा लहानसा तुकडा ( किंवा थोडा खवा ) - नाही घातला तरी चालेल
- एका मिक्सरच्या भांड्यात घट्ट दही , आंब्याचा गर , साखर , दूध आणि वेलची पावडर घालून चांगले घुसळून घ्यावे. ही घट्ट , मलईदार लस्सी पिण्यास देण्याआधी कमीत कमी ३० मिनिटे तरी फ्रिजमध्ये थंड होऊ द्यावे.
- आंबा लस्सी ग्लासमध्ये घालून त्यावर मलई बर्फीचे आणि बदाम,काजू, पिस्त्याचे काप घालून सजवावी !
Leave a Reply