
मी इनफोसीस मधे काम करीत असताना रोज संध्याकाळच्या स्नॅक्स मधे अबरचबर खाण्या पेक्षा सॅण्डवीचेस प्रिफर करायचे आणि बुधवार हा माझा अंडा डे म्हणून टीम मधे फेमस !
संध्याकाळी 5 वाजले की जूनियर्स घोळका करून गोळा व्हायचे ,”स्मिता आज अंडा डे है ना तो आज नया ओमलेट ट्राइ करते हैं” . आसच मी प्रत्येक बुधवारी एग स्पेशॅलिटी काउंटर वर बर्याच प्रकारची ऑमेलेट्ट्स खाउन बघितली , मेक्सिकन ऑमेलेट्ट, स्पॅनिश ऑमेलेट्ट ,अमेरिकन ऑमेलेट्ट , अशी विविध प्रकारची! त्या ऑम्लेट्स च्या रेसिपीस किती ऑथेंटिक होत्या हा भाग सोडला तर त्यांची चव आणि टेक्सचर अप्रतिम लागायचे ! एका ऑमेलेट्ट्स साठी 3 अंडी वापरुन , वेगवेगळ्या भाज्या वापरुन असा काही फक्कड ऑमेलेट्ट जमलेले असायचे की खाणार्याची जिव्हा खवळली म्हणूनच समजा!

पुढे एकदा पार्ट्नर च्या ऑफीस मध्ये दिवाळी पार्टी होती , तिथे Tortilla De Patatas नावाचा बहुतांशी चीज़ बर्स्ट पिझझया सारखा दिसणारा पदार्थ बफे काउंटर ला होता. कुतूहल म्हणून त्याचा एक छोटासा त्रिकोण मी प्लेट मधे घेतला , आणि काय सांगू तुम्हाला इतका अशक्य चविष्ट जमला होता ना , आणि मुख्य म्हणजे त्यात स्टफिंग बटाट्यांचे होते. बटाटा हा माझा वीकेस्ट पॉइण्ट आहे. छानशी गोडसर चव परंतु आवडला मला हा tortilla. घरी येऊन काही दिवसांनी असच इंटरनेट वर सहज सर्च मधे टाकले की काय आहे बघुया बर्र हा tortilla , तर चक्क याचे दूसरे सोप्पे नाव म्हणजे “स्पॅनिश ऑमेलेट्ट”. तरीच म्हटले की माझ्या ऑफीस मधे मिळणार्या त्या फ्लफी ऑमेलेट्ट्स चा प्रेरणा स्त्रोत कुठला! या ऑमेलेट्ट चा इतिहासही तितकाच मजेदार आहे बर्र का! Wiki काका म्हणतो की ,1817 मध्ये स्पेन आणि फ्रान्स च्या सीमेवरचे Navarre राज्यातल्या गरीब शेतकऱ्यांची अवस्था संगणार्या एका पत्रात याचा उल्लेख आढळतो की ” आमच्या स्त्रिया 2 किंवा 3 अंड्यांपासून बटाट्याचा हा tortilla बनवून 5 ते 6 माणसांना खाऊ घालू शकतात”! स्पेनच्या इतिहासात बर्याच वेळा याची नोंद झाली आहे.

माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या कोर्स मधे इंटरनॅशनल क्विज़ीन चा विषय होता. त्यात वेगवेगळ्या देशांच्या खाद्यसंस्कृतीची आम्हाला थोडक्यात ओळख करून दिली होती. स्पेन विषयी. वाचताना मला एक गोष्ट फार गंमतशीर वाटली होती .. जसे आपले पुणे दुपारचे 1 ते 4 वामकुक्षी साठी प्रसिद्ध आहे ना तसेच स्पेन मधे सारे हॉटेल्स आणि रेस्टोरेंट्स दुपारी भोजानानंतर बंद केले जातात कारण स्पॅनिश माणसाला आपापल्या कुटुंबाबरोबरचा एकांत अगदी प्रिय आहे. दुपारी जड जेवणानंतर जराशी डुलकी घेऊन फ्रेश झालेला स्पॅनिश मनुष्य आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत एकत्र वेळ घालवतो . स्पेन मधे शक्यतो रात्रीच्या जेवणाची वेळ 9 ते 11 अशी असते आणि स्पेन मधली हॉटेल्स शेरी वाइन सोबत अपीटाइज़र्स किंवा ज्याला आपण फिंगर फुड म्हणतो ना ते सर्व करतात . या अपीटाइज़र ना स्पॅनिश भाषेत Tapa म्हणतात. हे जे स्पॅनिश ऑमेलेट्ट आहे तेही याच tapas संस्कृतीचाच भाग आहे. ऑम्लेट चे छोटे छोटे बाइट साइज़्ड तुकडे करून शेरी वाइन सोबत दिले जातात . आहे ना मजेदार गोष्ट!
हे ऑमेलेट्ट सॅंडविच च्या रूपातही अगदी जबरदस्त लागते आणि ईतकेच नाही तर हे थंड झाल्यावर सुद्धा तितकेच चविष्ट लागते. तर मग कधी प्लान करताय हे ऑमेलेट्ट बनवायचा! लवकरच बनवा आणि तुमचे अभिप्राय कळवा खाली दिलेल्या कॉमेंट्स सेक्शन मधे!
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा


- 6 अंडी
- 1 मोठा कांदा– 100 ग्रॅम्स
- 5 मोठे बटाटे -450 ग्रॅम्स
- ½ टीस्पून सफेद मिरी पावडर किंवा काळी मिरी पावडर
- मीठ चवीप्रमाणे
- ½ कप तेल -125 ग्रॅम्स ( एक्सट्रा वर्जिन ऑलिव ओईल असेल तर नक्की वापरावे )
- सर्वप्रथम कांदा लांब पातळ चिरून घ्यावा. बटाट्यांच्या साली काढून , धुवून पातळ एक सारख्या फोडी करून घ्याव्यात.
- ऑमेलेट्ट बनवण्यासाठी आपल्याला एका खोलगट आणि पसरट पॅन ची गरज आहे. सपाट तवा घेऊ नये. पॅन मध्ये तेल घालून घेऊ . तेल तापले की कांदा आणि बटाटे घालून एकत्र मध्यम आचेवर परतून घेऊ.
- मिनिटे परतल्यानंतर आच मंद ठेवून हे मिश्रण शिजू देऊ . मिश्रण शिजताना पॅन च्या तळाला चिकटणार नाही याची दक्षता घ्यावी.
- जवळजवळ 20 मिनिटे आपण हे मिश्रण शिजवले आहे. बटाटे अगदी नरम होतात तेव्हा आपण गॅस बंद करू आणि ह्यातले जादा तेल वेगळे एका वाटीत गाळुन घेऊ. ह्याच तेलात आपण ऑमेलेट्ट शिजवणर आहोत.
- कांदा आणि बटाट्याचे मिश्रण एका भांड्यात काढून घेऊ. यातच अंडी फोडून घालावीत. सफेद मिरी पावडर आणि मीठ घालून घ्यावे. हे मिश्रण फोर्क किंवा चमच्याने फक्त मिसळून घ्यावे, खूप जास्त ढवळू नये. जर या मिश्रणात तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची , कोथिंबीर बारीक चिरून घालावी. हे अंड्याचे मिश्र्ण 10 मिनिटे झाकून ठेवावे.
- मिनिटनी आपण ऑमेलेट्ट बनवायला घेऊ. मिश्र्ण थोडे घट्ट होते . पॅनमधे 2-3 टेबलस्पून तेल घालून घेऊ. आच मंद ठेवून आपण मिश्रण पॅन मधे घालू आणि 1 मिनिट मोठ्या आचेवर शिजू देऊ.
- ऑमेलेट्ट जरा सेट झाले की आच मंद करून 2-3 मिनिटे शिजू देऊ.
- मिनिटांनंतर फोर्क ने ऑमेलेट्ट चेक करून पहावे, जर ते पॅन सोडत असेल तर गॅस बंद करावा. पण वर एक मोठी प्लॅट उपदी ठेवावाई आणि पॅन मधील ऑमेलेट्ट प्लेट मधे काढून घ्यावे. ही कृती करताना अजिबात घाई करू नये, सावकाश ऑमेलेट्ट प्लेट मधे उपडे करावे.
- आता आपण ऑमेलेट्ट ला दुसर्या बाजूने ही शिजवून घेऊ. ऑमेलेट्ट हळूहळू पॅन मधे परत सरकवावे आणि गॅस सुरू करावा. मंद आचेवर दुसर्या बाजूने ही 2- 3 मिनिटे शिजू द्यावे.
- मिनिटे शिजल्यानंतर परत गॅस बंद करावा आणि ऑमेलेट्ट वर सांगितलेल्या पद्धतीनेच प्लेट मधे उपडे करून घ्यावे. परत पॅन मधे सरकवून 2 मिनिटांसाठी शिजू द्यावे.
- ऑमेलेट्ट तयार झाले आहे , गरम गरम वाढावे. हे ऑमेलेट्ट थंड झाले तरी चविष्ट लागते हीच याची खासियत आहे.
Leave a Reply