गोडाची आंबोळी किती बनतील : ८-९ तयारीसाठी वेळ : १० तास शिजवण्यासाठी वेळ: ३० मिनिटे
Ingredients
साहित्य:
• १ कप = २०० ग्रॅम्स लहान दाण्यांचा तांदूळ - सुवासिक प्रतीचा असला तर उत्तम
• पाव कप = २५ ग्रॅम्स पोहे , स्वच्छ धुऊन
• अर्धा कप = ५० ग्रॅम्स किसलेले ताजे खोबरे
• अर्धा टीस्पून हळद
• पाव कप = ५० ग्रॅम्स गूळ
• १ जून काकडी ( तंवसे ) किसून
• पाव टीस्पून मीठ
• तेल
Instructions
कृती:
• तांदूळ स्वच्छ धुऊन २ कप पाण्यात ८ ते १० तासांसाठी भिजत घालावेत . तांदूळ भिजले की ते पाणी फेकून न देता बाजूला वाडग्यात काढून घ्यावे .
• तांदूळ , पोहे , गूळ , खोबरे आणि हळद मिक्सरमधून साधारण पाऊण कप पाणी घालून बारीक परंतु घट्टसर वाटून घ्यायचे आहे .
• वाटलेले पोळ्याचे पीठ झाकून साधारण दहा तासांसाठी उबदार जागी ठेवून द्यावे .
• पीठ दहा तासानंतर तयार होते . तेव्हा काकडी सोलून किसून घ्यावी . या किसात मीठ घालावे आणि पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यावा .
• काकडीचा कीस त्याला सुटलेल्या पाण्यासकट आंबोळीच्या पिठात मिसळून घ्यावा . गरज असेल तर अगदी थोडे किंचित पाणी मिसळून पीठ तव्यावर घालण्याइतपत सरसरीत करून घ्यावे .
• मध्यम ते मोठ्या आचेवर काहील किंवा नॉनस्टिक तवा चांगला तापवून घ्यावा . त्यावर थोडे तेल पसरवून घ्यावे .
• आच मध्यम करून एक ते दीड डाव पोळ्याचे पीठ तव्याच्या मध्यभागी नीट गोलाकार पसरवून घ्यावे . जरासे जाडसरच पोळे घालावेत . दोन मिनिटे मंद आचेवर झाकून शिजू द्यावी . त्यानंतर पोळा उलटून दुसऱ्या बाजूने देखील २- ३मिनिटे शिजवून घ्यावा .
• हे पोळे गाडी थंड झाले तरी लुसलुशीत लागतात . वरून तूप घालून नारळाचे दूध आणि गुळाच्या मिश्रणासोबत हे खावयास द्यावे .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/tavshache-pole-kakdichi-goad-amboli-tavsali/