कोबी चण्याच्या डाळीची भाजी - उपकरी
Author: 
Recipe type: side dish
Cuisine: Indian
 
तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे शिजवण्यासाठी वेळ: १५ मिनिटे कितीजणांना पुरेल : ४ ते ५
Ingredients
  • साहित्य:
  • • ५०० ग्रॅम्स कोबी लांब चिरून
  • • अर्धा कप चण्याची डाळ
  • • १ टीस्पून मोहरी
  • • अर्धा टीस्पून हिंग
  • • कढीलिंबाची पाने ८-१०
  • • ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • • १ टीस्पून हळद
  • • १ कप किसलेले ओले खोबरे
  • • तेल
  • • मीठ
Instructions
  1. कृती:
  2. • चण्याची डाळ स्वच्छ धुऊन पाण्यात १ तासासाठी भिजत घालावी . नंतर पाणी काढून टाकावे .
  3. • एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करावे . त्यात मोहरी , हिंग आणि हिरव्या मिरच्या घालून फोडणी करून घ्यावी .
  4. • आता भिजवलेली चण्याची डाळ घालून परतून घ्यावी ,
  5. • साधारण ५-६ मिनिटे डाळ शिजवून घ्यावी . आता हळद घालावी आणि १ मिनिट परतून घ्यावी .
  6. • चिरलेला कोबी घालून नीट एकत्र करून घ्यावे.
  7. • वाफवण्याच्या प्रक्रियेने कोबी झाकून शिजवून घ्यावा . जास्तीचे पाणी घालू नये .
  8. • साधारण ८ ते १० मिनिटांत कोबी शिजतो . नंतर चवीपुरते मीठ घालावे .
  9. • त्यावर किसलेले ओले खोबरे घालावे . नीट एकत्र करावे .
  10. • कोबीची उपकरी तयार आहे . पोळी , फुलके किंवा वरण भातासोबत वाढावी .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/konkani-cabbage-chana-dal-upkari-kobi-chana-dal-bhaji-upkari/