चमचमीत तवा पापलेट फ्राय
Author: 
Recipe type: Main
Cuisine: Indian
 
किती बनतील : ६- ८ तयारीसाठी वेळ : ३० मिनिटे बनवण्यासाठी वेळ : १० मिनिटे
Ingredients
  • साहित्य:
  • • २५० ग्रॅम्स पापलेट , स्वच्छ धुऊन , लांब पातळ तुकड्या करून
  • • १ टीस्पून हळद
  • • मीठ
  • • १ टेबलस्पून चिंचेचा गोळा
  • • दीड इंच आल्याचा तुकडा
  • • ४-५ हिरव्या मिरच्या
  • • ८-१० लसणीच्या पाकळ्या
  • • पाव कप कोथिंबीर
  • • ३ टेबलस्पून मालवणी मसाला
  • • ६ टेबलस्पून तांदळाचे पीठ
  • • तेल
Instructions
  1. कृती:
  2. • पापलेटच्या तुकड्यांना हळद आणि मीठ व्यवस्थित चोळून बाजूला ठेवावे.
  3. • हिरवे वाटण बनवण्यासाठी मिक्सरमधून आले , लसूण , चिंच , मिरच्या , कोथिंबीर व फक्त १ टेबलस्पून पाणी घालून घट्ट गोळा वाटून घ्यावा .
  4. • ही पेस्ट पापलेटच्या तुकड्यांना लावून २० ते ३० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवावे म्हणजे पेस्ट व्यवस्थित तुकड्यांना चिकटून राहते .
  5. • आता एका ताटलीत तुकड्यांच्या वरच्या आवरणासाठी कोरडे पीठ , मालवणी मसाला आणि मीठ मिसळून घ्यावे .
  6. • एका पसरट तव्यात २-३ टेबल्स्पून तेल गरम करून व्यवस्थित तव्यात पसरून घ्यावे . तेल चांगले तापले की आच मंद करावी .
  7. • कोरड्या मिश्रणात एकेक पापलेटची तुकडी चांगली दाबून घोळवावी . तव्यात कडेने सोडून या तुकड्या दोन्ही बाजूंनी खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्याव्यात ( साधारण २-३ मिनिटे एक बाजू तळून घ्यावी) .
  8. • हे तळलेले पापलेट नेहमीच्या फिश थाळीत तर शोभतेच पण स्टार्टर म्हणून अतिशय भाव खाऊन जाते !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/konkani-tawa-paplet-fry-pomfret-tawa-fry/