तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिटे
Ingredients
साहित्य:
• ६ व्हाईट / ब्राउन ब्रेड स्लाईस
• १ मोठा कांदा बारीक चिरून
• २ टोमॅटोच्या पातळ चकत्या
• १ भोपळी मिरची लांब बारीक चिरून
• २ उकडलेल्या बटाट्यांच्या चकत्या
• १ टीस्पून चाट मसाला
• मीठ चवीनुसार
• अर्धा कप कोथिंबीर पुदिन्याची चटणी
• बटर
• चीज
Instructions
• एका सॅन्डविचसाठी आपण ३ ब्रेड स्लाईसेस वापरणार आहोत . प्रत्येक स्लाईस वर बटर लावून घ्यावे . त्यानंतर प्रत्येक स्लाइसवर हिरवी चटणी चांगली दाटसर लावून घ्यावी .
• सगळ्यात पहिल्या स्लाइसवर बटाट्याच्या चकत्या ठेवाव्यात . त्यावर चिरलेला कांदा घालावा . थोडे मीठ भुरभुरावे . त्यावर दुसरी स्लाइस अलगद ठेवावी . हा सॅन्डविचचा पहिला थर तयार !
• नंतर दुसऱ्या स्लाइसवर टोमॅटोच्या चकत्या आणि भोपळी मिरचीचे तुकडे घालावेत . त्यावर थोडा चाट मसाला भुरभुरावा . चीज किसून घालावे .
• शेवटची ब्रेड स्लाईस अलगद दाबून बसवावी .
• सँडविच ग्रिल करण्यासाठी थोडे बटर ग्रील पॅन वर वितळवून घ्यावे . आच मंद करून त्यावर सँडविच ठेवावे . २ मिनिटे एका बाजूने खरपूस भाजू द्यावे .
• सॅन्डविचची बाजू उलटण्याआधी वरून थोडे बटर लावावे . दुसऱ्या बाजूने देखील ग्रिल होऊ द्यावे .
• गरमागरम सँडविच आपल्याला आवडेल त्या आकारात कापून चटणी किंवा टोमॅटो केचअप सोबत खायला द्यावे .
महत्त्वाच्या टिप्स:
सँडविच साठी ब्रेडवर बटर लावताना ते कधीही वितळवून घेऊ नये . ब्रेड मऊ पडतो आणि तुटू शकतो . सँडविच बनवण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी फ्रिजमधून बटर बाहेर काढावे ,म्हणजे ते आपोआप रूम टेम्परेचरला येऊन मऊ होते , आणि ब्रेडवर व्यवस्थित पसरते .
काही जणांना ब्रेड च्या कडा सँडविच खाताना आवडत नाहीत . परंतु सँडविच पूर्ण ग्रिल होऊन तयार होईपर्यंत त्या कडा कापू नयेत . कारण सँडविच ग्रिल होताना त्यांचा एक भक्कम आधार मिळतो अन सँडविच उलटताना तुटत नाही .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/bombay-veg-cheese-grilled-sandwich/