तयारीसाठी वेळ :१० मिनिटे शिजवण्यासाठी वेळ : १० मिनिटे
Ingredients
साहित्य:
• २५० ग्रॅम्स लांब किंवा बुटक्या जाड अशा हिरव्या मिरच्या ( भावनगरी असेल तर उत्तम )
• २ कप = १८० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
• २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
• १ लिंबाचा रस
• दीड टीस्पून हळद
• पाव टीस्पून हिंग
• चवीपुरते मीठ
• अर्धा कप बेसन ( चण्याचे पीठ )
• तेल
Instructions
कृती:
• मिरच्या स्वच्छ धुऊन कोरड्या फडक्याने पुसून घ्याव्यात . मिरच्यांच्या मधोमध देठापासून ते टोकापर्यंत एक लांब चीर पडून घ्यावी . देठ तुटू देऊ नये .
• एका मोठ्या वाडग्यात किसलेले खोबरे , हळद १ टीस्पून , हिंग , कोथिंबीर आणि मीठ घालून एकत्र करून घ्यावे . लिंबाचा रस घालून ढवळून घ्यावे .
• आता बेसन घालून एकत्र मिळून घ्यावे जेणेकरून आपल्याला ते मिरच्यांत भरता येईल .
• हे सारण मिरच्यांच्या दाबून भरावे परंतु जास्त भरून मिरच्या तुटू देऊ नयेत नाहीतर त्या तेलात सोडता क्षणीच पसरतात .
• एका पसरट तव्यात ४-५ टेबलस्पून तेल गरम करावे , तेल चांगले तापले की आच मंद करून हळूच मिरच्या तेलात सोडाव्यात . व्यवस्थित कडा पालटून खरपूस तळून ( शॅलो फ्राय ) घ्याव्यात .
• या मिरच्या गरमागरम कढी भात , कोकम सार भात किंवा मसुराच्या आमटीसोबत वाढाव्यात .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/konkani-stuffed-green-chili-talaleya-bharlya-mirchya/