कितीजणांसाठी बनेल : ४ ते ५ तयारीसाठी वेळ : १० मिनिटे शिजवण्यासाठी वेळ: २५ मिनिटे
Ingredients
साहित्य:
• ४०० ग्रॅम्स दही
• ४ टेबलस्पून बेसन ( ३० ग्रॅम्स )
• १ टीस्पून साखर
• मीठ चवीनुसार
• २ टेबलस्पून बारिक चिरलेली कोथिंबीर
• ८-१० लसणीच्या पाकळ्या
• १ इंच आल्याचा तुकडा
• ३ हिरव्या मिरच्या
• अर्धा टीस्पून हळद
• २ टेबलसंपून तेल
• १ टीस्पून मोहरी
• पाव टीस्पून हिंग
• १ टीस्पून जिरे
• ८-१० कढीलिंबाची पाने
• ३ सुक्या लाल मिरच्या
Instructions
कृती:
• आले , लसूण आणि हिरव्या मिरच्या २-३ टेबलस्पून पाणी घालून बारीक वाटून घ्यावे .
• एका मोठ्या वाडग्यात दही , बेसन घालून नीट फेटून घ्यावे . गुठळ्या राहू देऊ नयेत . आता तयार केलेले हिरवे वाटण , साखर , मीठ , हळद आणि चिरलेली कोथिंबीर घालून नीट ढवळून घ्यावी .
• आता २-३ कप पाणी घालावे . हे कढीचे मिश्रण एका कढईत घालावे , आणि मध्यम आचेवर एक हलकी उकळी येऊ द्यावी . पाच मिनिटांत एक उकळी आली की आच मंद करावी . कढी हळूहळू शिजू द्यावी . मधून मधून चमच्याने ढवळत राहावे .
• २० ते २५ मिनिटे कढी बारीक आगीवर शिजली की चांगली घट्ट होते . गॅस बंद करावा .
• फोडणीसाठी २ टेबलस्पून तेल गरम करावे . त्यात मोहरी , जिरे , हिंग , सुक्या लाल मिरच्या आणि कढीलिंबाची चुरचुरीत फोडणी करावी . ही फोडणी काढीत मिसळून लगेच झाकण घालावे .
• कढी जराशी निवली कि जीरा भातासोबत वाढावी !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/maharashtrian-dahyachi-kadhi/