कितीजणांना पुरेल : ४ ते ५ तयारीसाठी वेळ: २० मिनिटे शिजवण्यासाठी वेळ : ४५ मिनिटे
Ingredients
साहित्य:
• ७५० ग्रॅम गावठी/ ब्रॉयलर कोंबडीचे चिकन , स्वच्छ धुऊन , मध्यम आकाराच्या तुकडे करून
• १ कप कोथिंबीर
• अर्धा कप पुदिन्याची पाने
• ४ हिरव्या मिरच्या
• दीड इंच आल्याचा तुकडा
• ७-८ लसणीच्या पाकळ्या
वाटणासाठी :
• पाऊण कप = ७५ ग्रॅम्स किसलेले सुके खोबरे
• १ मोठा कांदा = १०० ग्रॅम्स लांब चिरलेला
• ५-६ लसणीच्या पाकळ्या
• १ टीस्पून हळद
• ५ टेबलस्पून मालवणी मसाला
• अर्ध्या लिंबाचा रस
• मीठ
• तेल
Instructions
कृती:
• चिकनच्या तुकड्यांना हळद ,थोडे मीठ आणि लिंबाचा रस चोळून १० मिनिटे बाजूला ठेवून द्यावे .
• मिक्सरमधून आले , लसूण , मिरच्या , कोथिंबीर आणि पुदिना पाव कप पाणी घालून बारीक वाटून घ्यावे .
• एका प्रेशर कूकरमध्ये ३-४ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात हिरवं वाटण घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे ( ४-५ मिनिटे )
• आता चिकनचे तुकडे घालून नीट मसाल्यात एकत्र करून घ्यावेत . आच मंद करून झाकून ३-४ मिनिटे एक वाफ काढावी .
• चिकनला थोडे पाणी सुटू लागते . कुकर मध्ये दीड कप पाणी घालून कुकर बंद करावा . मंद ते मध्यम आचेवर १० -१२ मिनिटे चिकन शिजवून घ्यावे . २-३ शिट्ट्या काढल्या तरी हरकत नाही .
• कुकर थंड होईपर्यंत वाटप करून घ्यावे . एका तव्यात सुके खोबरे चांगले खरपूस भाजून घ्यावे ( ५-६ मिनिटे ) . एका ताटलीत काढून घ्यावे .
• त्याच तव्यात १-२ टेबलस्पून तेल घालून लसूण गुलाबी रंगावर परतून घ्यावी . नंतर कांदा घालून चांगला खरपूस भाजून घ्यावा ( ८ ते १० मिनिटे ) .
• नंतर भाजलेले सुके खोबरे मिसळून गॅस बंद करावा . वाटप थंड झाले की मिक्सरमध्ये पाऊण कप पाणी घालून बारीक वाटून घ्यावे .
• एका मोठ्या लंगडीत ३-४ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात मालवणी मसाला घालून तो करपू नये म्हणून थोडे पाणी घालावे . तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे .
• आता वाटण घालून मंद आचेवर चांगले परतून घ्यावे ( ५मिनिटे ) .
• नंतर चिकनचे तुकडे घालून त्यातच चिकन शिजवलेले पाणी घालावे . मध्यम आचेवर एक उकळी येऊ द्यावी . चवीपुरते मीठ घालावे . झाकून मंद आचेवर ५-७ मिनिटे रस्सा मुरत शिजवून घ्यावा .
• हा कोंबडीचा रस्सा पोळी , भाकरी , आंबोळी , वडे किंवा भातासोबत वाढावा.
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/konkani-kombdi-rassa-chicken-curry-in-pressure-cooker-konkani-chicken-curry/