पनीर पराठा - Paneer Paratha
Author: 
Recipe type: Main
Cuisine: Indian
 
किती बनतील : ८ ते १० तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे बनवण्यासाठी वेळ : ३० मिनिटे
Ingredients
  • साहित्य:
  • पराठ्यांसाठी:
  • • २ कप = २५० ग्रॅम्स गव्हाचे पीठ
  • • १ टीस्पून मीठ
  • • २ -३ टीस्पून तेल
  • पनीरचे सारण:
  • • १ लहान कांदा = ६० ग्रॅम्स बारीक चिरून
  • • ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • • पाव टीस्पून हळद
  • • अर्धा टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
  • • पाव टीस्पून गरम मसाला पावडर
  • • अर्धा टीस्पून धणे पावडर
  • • अर्धा टीस्पून भाजलेली जिरे पावडर
  • • अर्धा टीस्पून चाट मसाला
  • • पाव कप कोथिंबीर बारीक चिरून
  • • २५० ग्रॅम पनीर
  • • चवीनुसार मीठ
Instructions
  1. कृती:
  2. • एका मोठ्या वाडग्यात गव्हाचे पीठ आणि मीठ एकत्र करून घ्यावे . त्यात तेल घालून नीट चोळून घ्यावे . साधारण पाऊण कप पाणी वापरून पोळ्यांसाठी मळतो तशी कणीक मऊ मळून घ्यावी , फार सैल ठेवू नये . कणकेला तेलाचा हात लावून झाकून १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवावे .
  3. • पनीर चे सारण बनवण्यासाठी एका पॅन मध्ये दीड टेबलस्पून तेल गरम करावे . त्यात बारीक चिरलेला कांदा , हिरव्या मिरच्या घालून कांदा मऊ परतून घ्यावा .
  4. • ३- ४ मिनिटांनंतर कोरडे मसाले घालावेत - हळद, लाल मिरची पूड , गरम मसाला पावडर , धणे पावडर , जिरे पूड , आणि चाट मसाला . सगळे नीट एकत्र परतून घ्यावे .
  5. • २-३ मिनिटे झाली की चवीपुरते मीठ घालावे . कोथिंबीर घालावी आणि नीट एकत्र करून घ्यावे . नंतर किसलेले पनीर घालावे . २-३ मिनिटे शिजून कोरडे होऊ द्यावे . गॅसवरून उतरवून पूर्ण थंड होऊ द्यावे .
  6. • कणकेच्या दोन छोट्या फुलक्यांच्या आकाराच्या पोळ्या लाटून घ्याव्यात . एका पोळीवर मधोमध सारण घालून हाताने नीट पसरवून घ्यावे . पोळीच्या कडांना पाणी लावावे आणि वरून दुसरी पोळी ठेवून कांदा दाबून बंद कराव्यात .
  7. • तांदळाचे पीठ लावून हलक्या हाताने पराठे लाटण्याने एकाच दिशेने लाटत जावे . लाटण्यावर खूप दाब देऊ नये .
  8. • मध्यम ते मोठ्या आचेवर तवा चांगला तापवून पराठे दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावेत . भाजताना तेल , तूप किंवा लोणी वापरावे .
  9. • गरमागरम पनीर पराठे मख्खन , पुदिना चटणी किंवा दही लोणच्यासोबत फस्त करावेत .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/paneer-paratha-stuffed-paneer-paratha-breakfast/