कितीजणांसाठी बनेल : ४ ते ५ तयारीसाठी वेळ: ३६ तास शिजवण्यासाठी वेळ : ४० मिनिटे
Ingredients
साहित्य:
• १ कप = २५० ग्रॅम्स कडवे वाल
• १ मोठा कांदा = १०० ग्रॅम्स लांब पातळ चिरलेला
• अर्धा कप = ५० ग्रॅम्स किसलेले सुके खोबरे
• अर्धा कप कोथिंबीर
• २ मोठे टोमॅटो = १२५ ग्रॅम्स प्युरी करून
• २ शेवग्याच्या शेंगा = ६० ग्रॅम्स , ३ ते ४ इंचाचे तुकडे करून
• १ मोठा बटाटा = १०० ग्रॅम्स , चौकोनी तुकडे करून
• १० -१२ कढीपत्ता
• १२-१५ लसणीच्या पाकळ्या
• अर्धा टीस्पून हिंग
• अर्धा टीस्पून हळद
• अर्धा टीस्पून धणे पावडर
• २ टेबलस्पून मालवणी मसाला
• मीठ
• तेल
Instructions
कृती:
• कडवे वाल रात्रभर ( १० ते १२ तास ) पाण्यात बजावून ठेवावेत . सकाळी त्यातील पाणी काढून चाळणीत १५ मिनिटे निथळत ठेवावेत . त्यानंतर एका फडक्यात बांधून किंवा चाळणीतच झाकून उष्ण जागी ठेवावेत म्हणजे त्यांना मोड येतील .
• एक दिवस मोड काढल्यानंतर वाल २ तासांसाठी पाण्यात बुडवून ठेवावेत . त्यामुळे त्यांच्या साली निघणे सोप्पे जाते . वाल सोलून घ्यावेत .
• वाटपासाठी एका कढईत सुके खोबरे ४-५ मिनिटे खरपूस भाजून घ्यावे. एका ताटलीत काढून घ्यावे .
• त्याच कढईत २-३ टेबलस्पून तेल घालून लसूण गुलाबी रंगावर परतून घ्यावी. नंतर कांदा घालून चांगला ७-८ मिनिटे भाजून घ्यावा . मग कोथिंबीर घालावी , जराशी परतून घ्यावी . भाजलेले खोबरे घालावे आणि नीट एकत्र करून घ्यावे .
• हे सगळे थंड झाले की मिक्सरमधून पाणी घालून बारीक वाटून घ्यावे .
• एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करावे . त्यात कढीपता , हिंगाची फोडणी करावी . मग हळद आणि मालवणी मसाला घालून एकत्र करून घ्यावे . वाटप घालावे आणि सोबत धणे पावडर सुद्धा ! हा मसाला तेलात चांगला परतून घ्यावा .
• मसाल्याला तेल सुटू लागले की त्यात बटाटे , शेंगा आणि वाल घालावेत . २ कप गरम पाणी घालावे . नीट ढवळून मध्यम आचेवर शिजू द्यावे .
• मध्यम आचेवर एक उकळी फुटली की आच मंद करावी आणि झाकण घालून शिजू द्यावे . साधारण १५ मिनिटानंतर टोमॅटोची प्युरी घालावी . झाकण घालून ५-६ मिनिटे शिजू द्यावे .
• वालाचे बिरडे तयार आहे ! घडीची पोळी , तांदळाची भाकरी किंवा भातासोबत अतिशय छान लागते !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/konkani-kadvya-valache-birde/