आंब्याच्या रसातले सांदण
Author: 
Recipe type: Dessert
Cuisine: Indian
 
तयारीसाठी वेळ : ६ तास बनवण्यासाठी वेळ : ३० मिनिटे
Ingredients
 • साहित्य:
 • • १ कप = २०० ग्रॅम्स तांदळाचा रवा ( इडली रवा )
 • • १ कप = २४० ग्रॅम्स आंब्याचा रस ( ताजा / फ्रोजन )
 • • पाऊण कप साखर = १५० ग्रॅम्स
 • • अर्धा कप = ५० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
 • • पाव टीस्पून ताजी कुटलेली वेलची पावडर
 • • चिमूटभर मीठ
 • • तूप
 • • पाणी
 • • अर्धा टीस्पून कुकिंग सोडा ( ऐच्छिक )
Instructions
 1. कृती :
 2. • रवा मंद ते मध्यम आचेवर कढईत गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यावा : साधारण ४-५ मिनिटे
 3. • एका मोठ्या वाडग्यात आंब्याचा रस , साखर नीट एकत्र ढवळून घ्यावी . नंतर भाजलेला रवा , ओले खोबरे , वेलची पावडर , मीठ आणि १ टेबलस्पून तूप घालून नीट एकत्र करून घ्यावे .
 4. • साधारण पाऊण कप पाणी घालावे आणि नीट ढवळून एका तासासाठी बाजूला झाकून ठेवावे .
 5. • एका तासानंतर मिश्रण चांगले फुलून येते . यात आता सोडा घालून पटकन ढवळून घ्यावे . तुमच्याकडे वेळ असल्यास अजून एका तासासाठी तुम्ही मिश्रण ठेवू शकता , मग सोडा घालायची गरज लागत नाही .
 6. • एका केकच्या गोल टिन मध्ये किंवा कूकरच्या गोल भांड्यात तूप लावून हे मिश्रण ओतावे आणि हलके टिन आपटून एकसंध करून घ्यावे .
 7. • मोदक पात्रात पाणी उकळवून त्यावर चाळणी ठेवावी . त्यावर हा टिन ठेवून मंद ते मध्यम आचेवर झाकून सांदणं २५ ते ३० मिनिटे वाफवून घ्यावीत . इडलीच्या साच्यात सुद्धा छोटो छोटी सांदणे वाफवून घेता येतात .
 8. • सांदणे वाफवून झाली की ती पूर्ण थंड झाल्याशिवाय काढायचा प्रयत्न करू नये , कारण आतून मऊसूत असल्याने ती तुटू शकतात .
 9. • गरमागरम सांदणे नारळाच्या दुधात वेलची नी गूळ घालून खावयास द्यावीत . थोडा सुका मेवा वरून घालण्यास हरकत नाही !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/ambyachya-rasatle-sandan-konkani-mango-cake-mango-sandan/