कोकणी पद्धतीचे कोकमाचे सार
Author: 
Recipe type: Main
Cuisine: Indian
 
कितीजणांसाठी बनेल : ३ ते ४ तयारीसाठी वेळ : २० मिनिटे शिजवण्यासाठी वेळ : १० मिनिटे
Ingredients
  • साहित्य:
  • • ३७५ ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
  • • ६-७ कोकमं
  • • मीठ चवीनुसार
  • • २ हिरव्या मिरच्या
  • • १ टीस्पून हळद
  • • २ टीस्पून जिरे
  • • ६-७ लसणीच्या पाकळ्या
  • • पाव कप कोथिंबीर
  • • १ टीस्पून मोहरी
  • • पाव टीस्पून हिंग
  • • १०-१२ कढीलिंबाची पाने
  • • तेल
Instructions
  1. कृती:
  2. • एका पातेलीत अर्धा कप पाणी उकळत ठेवावे . त्यात कोकमं घालून ४-५ मिनिटे उकळू द्यावी . कोकमाचा रस पाण्यात उतरू लागला की गॅस बंद करावा आणि आगळ थंड होऊ द्यावे .
  3. • मिक्सरच्या भांड्यात ओले खोबरे , मिरच्या , लसूण , कोथिंबीर , जिरे , हळद आणि दीड कप पाणी घालून बारीक वाटून घ्यावे .
  4. • हे वाटण एका पातेल्यावर गाळणी ठेवून , त्यावर सुती कापड पसरून गाळून घ्यावे . हे घट्ट नारळाचे दूध तयार आहे .
  5. • आता कोकम हातानेच चुरून ते आगळ गाळणीतून वेगळे वाटीत गाळून घ्यावे .
  6. • कोकमाचे आगळ आणि नारळाचे दूध एकत्र ढवळून घ्यावे . चवीपुरते मीठ घालावे .
  7. • एका कढईत २-३ टेबल्स्पून तेल गरम करावे . त्यात मोहरी, हिंग , कढीलिंब यांची फोडणी करून नंतर नारळाच्या दुधाचे मिश्रण घालून पटकन ढवळून घ्यावे .
  8. • मंद आचेवर २-३ मिनिटे हे सार शिजवून घ्यावे . त्यानंतर गॅस बंद करून झाकण घालून सार जरा मुरू द्यावे आणि मगच वाढावे .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/konkani-kokam-saar-amsule-saar/