आलू बोन्डा /Urrulai Kizhangu Bonda /Potato Bonda in Marathi
Author: 
Recipe type: Appetizer
Cuisine: Indian
 
किती बनतील : १५ ते १८ तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे शिजवण्यासाठी वेळ : ३० मिनिटे
Ingredients
  • साहित्य:
  • • अर्धा कप तांदूळ = १२५ ग्रॅम्स
  • • अर्धा कप उडीद डाळ = १२५ ग्रॅम
  • • अर्धा किलो उकडलेले बटाटे
  • • अर्धा टीस्पून उडीद डाळ
  • • अर्धा टीस्पून मोहरी
  • • ५ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • • २ मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून = १२५ ग्रॅम्स
  • • अर्धा टीस्पून हळद
  • • २ मोठे टोमॅटो बारीक चिरून = १५० ग्रॅम्स
  • • पाव कप कोथिंबीर बारीक चिरून
  • • एका लिंबाचा रस
Instructions
  1. कृती:
  2. • तांदूळ आणि उडीद डाळ पाण्याने ३-४ वेळा खळखळून धुऊन रात्रभर किंवा २ तासांसाठी पाण्यात भिजत घालावेत . नंतर त्यातील जास्तीचे पाणी काढून टाकून अगदी बारीक वाटावे . मला हे मिश्रण वाटण्यासाठी पाऊण कप पाणी लागले आहे . त्यात अर्धा टीस्पून मीठ घालावे आणि हे मिश्रण एका बाजूला ठेवून द्यावे .
  3. • उकडलेले बटाटे साली काढून किसून घ्यावेत म्हणजे ते एकसंध किसले जातात , त्यात गुठळ्या किंवा फोडी राहत नाहीत .
  4. • बटाट्याचे मिश्रण बनवण्यासाठी ३ टेबलस्पून तेल गरम करावे . त्यात उडीद डाळीची फोडणी करावी , मोहरी घालून तडतडू द्यावी . चिरलेल्या मिरच्या व कांदा घालावा . कांदा जरा पारदर्शक होऊ द्यावा .
  5. • चार पाच मिनिटांनी हळद घालावी . नंतर बारीक चिरलेला टोमॅटो , चवीपुरते मीठ नी थोडी चिरलेली कोथिंबीर घालावी . नीट एकत्र करून घ्यावे . झाकून मंद आचेवर शिजू द्यावे .
  6. • पाच मिनिटांनंतर किसलेले बटाटे , लिंबाचा रस आणि उरलेली कोथिंबीर घालून एकत्र करून घ्यावी. मिश्रण गॅस वरून उतरवून पूर्ण थंड होऊ द्यावे .
  7. • एका बाजूला बोन्डा तळण्यासाठी पुरेसे तेल कढईत गरम व्हावयास ठेवावे . तोपर्यंत बोनड्यांचे गोल आकार बनवून घ्यावेत .
  8. • तेल चांगले तापले की आच मध्यम करावी. एकेक बोन्डा वर तयार केलेल्या तांदूळ नी उडीद डाळीच्या मिश्रणात बुडवून अलगद तेलात सोडावा . ३- ४मिनिटे चांगले खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्यावे.
  9. • हे गरमागरम कुरकुरीत आलू बोन्डा नारळाच्या फ्रेश चटणीसोबत वाढावे .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/aloo-bonda-urrulai-kizhangu-bonda-potato-bonda-in-marathi/