किती बनतील : ४ तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे शिजवण्यासाठी वेळ : २५ मिनिटे
Ingredients
साहित्य:
• ४ मोठ्या आकाराच्या सुरमईच्या तुकड्या ( १ तुकडी साधारण १०० ग्रॅम )
• २ टीस्पून हळद
• १ लिंबाचा रस
• मीठ चवीनुसार
• दीड इंच आल्याचा तुकडा
• ४ हिरव्या मिरच्या
• ८-१० लसणीच्या पाकळ्या
• पाव कप कोथिंबीर
• पाऊण कप बारीक रवा
• पाव कप तांदळाचे पीठ
• ३ टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
• तेल
Instructions
कृती:
• सुरमईला मॅरीनेट करण्यासाठी एल ताटलीत हळद, लाल मिरची पूड ( १ टीस्पून ) , मीठ आणि लिंबाचा रस नीट एकत्र करून घ्यावा . त्यात सुरमईच्या तुकड्या घोळवून १० मिनिटे बाजूला मुरत ठेवाव्यात .
• हिरवे वाटण - आले , लसूण , मिरच्या आणि कोथिंबीर १ टेबलस्पून पाणी घालून बारीक व घट्टसर वाटून घ्यावे .
• माशाच्या तुकड्यांना लावून ह्या तुकड्या फ्रिजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवाव्यात , म्हणजे ते मिश्रण व्यवस्थित चिकटून राहते .
• एका ताटात रवा , तांदळाचे पीठ , मीठ आणि उरलेली मिरची पूड घालून नीट एकत्र करून घ्यावे .
• एकेक सुरमईची तुकडी नीट दाबून दोन्ही बाजूंनी या कोरड्या मिश्रणात घोळवावी.
• तव्यात पुरेसे तेल घालावे कि ज्यात आपण मासे शॅलो फ्राय करू शकतो . मध्यम आचेवर तेल चांगले तापवून घ्यावे . नंतर आच मंद करून तव्याच्या मध्यभागी सुरमईची तुकडी सोडून दोन्ही बाजूंनी ( साधारण २-३ मिनिटे एक बाजू ) खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळावी .
• सुरमई रवा फ्राय भाकरी , पोळी , कालवण भात किंवा नुसत्या वरण भातासोबत देखील चविष्ट लागते !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/hotel-style-crispy-surmai-rava-fry-in-marathi/