तयारीसाठी वेळ : १० मिनिटे शिजवण्यासाठी वेळ : १५ मिनिटे कितीजणांना पुरेल : ३- ४
Ingredients
साहित्य:
२५० ग्रॅम्स भेंडी - स्वच्छ धुऊन , १५ मिनिटे चाळणीत निथळत ठेवावी . त्यानंतर एका स्वच्छ कापडाने पुसून मग चिरावयास घ्यावी . साधारण १ दीड इंचाचे तुकडे चिरून घ्यावेत
मोठा कांदा लांब चिरून = १०० ग्राम
३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
७-८ लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून
१ टीस्पून हळद
२-३ कोकमं
अर्धा कप = ५० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
तेल
चवीपुरते मीठ
Instructions
कृती:
एका नॉनस्टिक किंवा लोखंडाच्या कढईत २-३ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात लसूण घालून जरा गुलाबी रंगावर परतून घ्यावी .
नंतर मिरच्यांचे तुकडे, कांदा घालून जरा मऊ होईपर्यंत परतून घ्यावा .
कांदा पारदर्शक होत आला की हळद घालावी आणि जराशी परतून घ्यावी . नंतर चिरलेली भेंडी घालून आच मध्यम करून जरा एकत्र करून घ्यावी.
आच मंद करावी आणि आणि भाजी सारखी परतत राहून झाकण न घालता शिजवून घ्यावी .
भेंडी शिजत आली की शेवटी चवीपुरते मीठ घालावे . त्यातच कोकमं पिंजून घालावीत . भाजी नीट एकत्र करून घ्यावी.
साधारण मिनिटभर शिजवल्यावर वरून खोबरे घालावे आणि गॅस बंद करावा .
ही साधी, सोप्पी तरीही चविष्ट अशी भेंडीची भाजी , डब्यासाठी एकदम मस्त ! तांदळाची भाकरी , चपाती , फुलके किंवा वरण भातासोबत अतिशय छान लागते !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/konkani-stir-fried-okra-bhendichi-bhaji/