कितीजणांना पुरेल : ४ ते ५ तयारीसाठी वेळ : ३० मिनिटे शिजवण्यासाठी वेळ : ४० मिनिटे
Ingredients
साहित्य :
1. दीड कप = २०० ग्रॅम्स ओले काजूगर , धुऊन आणि सोलून
2. १ लहान आकाराचा बटाटा = ५० ग्रॅम्स चौकोनी तुकडे करून
3. १ मध्यम आकाराचा कांदा = ७० ग्रॅम्स बारीक चिरून
4. १ मोठा टोमॅटो = ८० ग्रॅम्स बारीक चिरून
मसाल्याचे वाटण :
5. १ मध्यम आकाराचा कांदा = ८० ग्रॅम्स लांब पातळ चिरून
6. दीड इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून
7. ८-१० लसणीच्या पाकळ्या
8. अर्धा कप = ५० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
9. पाव कप कोथिंबीर
गरम मसाला :
10. १ तमालपत्र
11. १ चक्रीफूल
12. ३ वेलदोडे
13. ३-४ लवंग
14. ५-६ काळी मिरी
15. अर्धा इंच दालचिनीचा तुकडा
16. २ टीस्पून धणे
17. अर्धा टीस्पून बडीशेप
18. १ टीस्पून जिरे
19. १०-१२ कढीलिंबाची पाने
20. अर्धा टीस्पून मोहरी
21. पाव टीस्पून हिंग
22. अर्धा टीस्पून हळद
23. दीड टीस्पून मालवणी मसाला
24. चवीपुरते मीठ
25. १ टीस्पून चिंचेचा गोळा १ टेबलस्पून गरम पाण्यात भिजवून
26. १ टीस्पून गूळ
27. तेल
Instructions
कृती :
• गरम मसाल्याचे सगळे साहित्य मंद आचेवर चांगले २-३ मिनिटे भाजून घ्यावे . त्यानंतर थंड झाले की मिक्सरमधून ताजा सुगंधी गरम मसाला वाटून घ्यावा .
• त्याच कढईत किसलेले खोबरे मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावे . बाजूला काढून घ्यावे .
• नंतर कढईत २-३ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात आले, लसूण घालून परतून घ्यावे . लसूण जराशी तपकिरी झाली की त्यात लांब चिरलेला कांदा घालून खरपूस परतून घ्यावा . कांदा चांगला ७-८ मिनिटे परतून झाला की त्यात ताजी कोथिंबीर घालावी . नीट तेलात एकत्र करून घ्यावी . मग भाजलेले खोबरे घालून एकत्र करून घ्यावे . नंतर गॅस बंद करावा आणि वाटण थंड झालयावर मिक्सरमधून अर्धा कप पाणी घालून बारीक वाटून घ्यावे .
• एका कढईत ३ टेबलस्पून तेल घालावे . तेल चांगले तापले की त्यात मोहरी , हिंग, कढीलिंबाची फोडणी करावी . मग बारीक चिरलेला कांदा घालून मऊ होईपर्यंत परतून घ्यावा .
• नंतर हळद आणि मालवणी मसाला घालून परतून घ्यावा . मसाला करपू देऊ नये , थोडे पाणी घालून नीट तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा .
• आता बटाटयाच्या फोडी व काजूगर घालून २-३ मिनिटे परतून घ्यावेत . आता अर्धा कप पाणी घालून जरा उकळी येऊ द्यावी . नंतर आच मंद करून झाकून ५-७ मिनिटे शिजू दयावे .
• आता टोमॅटो घालून ते लवकर मऊ व्हावेत म्हणून थोडे मीठ घालावे . झाकण घालून मंद आचेवर शिजू द्यावेत .
• आता वाटण घालावे , गरम मसाला घालून नीट मिक्स करून घ्यावे. २ कप पाणी घालून मध्यम आचेवर रस्सा उकळू द्यावा . नंतर मंद आच करून झाकण घालून भाजी चांगली शिजू द्यावी .
• साधारण १२ मिनिटे भाजी शिजल्यावर त्यात गूळ , चिंचेचा घट्ट कोळ आणि चवीपुरते मीठ घालून एकत्र करून घ्यावे .
• गॅस बंद करावा , आणि भाजी झाकून जरा मुरू द्यावी . ही काजूगरांची उसळ आंबोळी , पोळी , घावन , वडे तसेच भातासोबत उत्तम लागते .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/konkani-kaju-usal-kajuchi-bhaji-konkani-cashew-gravy/