कढी पकोडा - KADHI-PAKODA (A TANGY YOGURT BASED GRAVY WITH GRAM FLOUR)
Author: Smita Mayekar Singh
Recipe type: Main
Cuisine: Indian
तयारीसाठी वेळ : २० मिनिटे शिजवण्यासाठी वेळ : ४५ मिनिटे कितीजणांना पुरेल : ४ ते ५
Ingredients
साहित्य:
कढीचे साहित्य:
२ कप आंबट दही = ४५० ग्रॅम ( अति आंबट किंवा गोड दही टाळावे )
अर्धा कप बेसन = ५० ग्रॅम्स
१ मध्यम आकाराचा कांदा = ८० ग्रॅम्स लांब पातळ चिरून
दीड इंच आल्याचा तुकडा किसून
अर्धा टीस्पून मोहरी
१ टीस्पून जिरे
२ टीस्पून धणे जाडसर कुटून
१ टीस्पून हळद
पाव टीस्पून लाल मिरची पूड
अर्धा टीस्पून हिंग
पकोड्याचे साहित्य:
१ कप बेसन= १०० ग्रॅम
२ टीस्पून धणे जाडसर कुटून
१ टीस्पूनलाल मिरची पूड
१ टेबलस्पून दही
तेल
चवीनुसार मीठ
२ ते ३ टेबलस्पून तूप
२ सुक्या लाल मिरच्या
Instructions
कृती :
सगळ्यात पहिल्यांदा पकोड्याचे / भजीचे पीठ भिजवून घेऊया. एका मोठ्या भांड्यात बेसन , कुटलेले धणे , लाल मिरची पूड , दही ,मीठ आणि १ टेबलस्पून गरम तेल घालून एकत्र करून घ्यावे . त्यात थोडे थोडे पाणी ( साधारण अर्धा कप ) घालून ते पीठ चांगले फेटून घ्यावे . . हे पीठ फार पातळ किंवा घट्ट भिजवू नये . हे मिश्रण किमान ४५ मिनिटांसाठी झाकून ठेवावे .
कढीच्या मिश्रणासाठी एका मोठ्या वाडग्यात दही, बेसन , लाल मिरची पूड , हळद , आणि चवीपुरते मीठ घालून चांगले फेटून घ्यावे . बेसनाच्या गुठळ्या राहू देऊ
नयेत . बेसन दह्यात नीट मिक्स झाल्यावर त्यात ३ कप पाणी घालून ढवळून घ्यावे .
कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात मोहरी , जिरे , हिंग , भरडले धणे , चिरलेले आले घालून नीट परतून घ्यावे . याच फोडणीमुळे कढी चविष्ट लागते . आता चिरलेला कांदा घालून मऊ होईपर्यंत परतून घ्यावा .
नंतर आच मंद करून कढीसाठी बनवलेले मिश्रण कढईत हळूहळू ओतून ढवळून घ्यावे , म्हणजे कढी उष्णतेने फुटत नाही . या कढीत मध्यम आचेवर एक हलकी उकळी येऊ द्यावी . कढी खळखळून उकळू नये .
टीप : नंतर आच मंद करून झाकून कढी ४० ते ४५ मिनिटे शिजू द्यावी . मंद आचेवर शिजलेली कढी फुटत तर नाहीच परंतु तिला अतिशय छान चव येते .मध्ये मध्ये कढी सारखी ढवळावी , म्हणजे तळाला चिकटत नाही .
कढी अर्धा तास शिजली की आपण बाजूला पकोडे तळायला घेऊ .
कढईत पकोडे बुडतील एवढे तेल तापायला ठेवूया . तेल चांगले गरम झाले की चमच्याने पकोड्याचे मिश्रण तेलात सोडायचे आहे . हे पकोडे मध्यम ते मोठ्या आचेवर चांगले खरपूस तळून घ्यायचे आहेत .
पकोडे तळल्यानंतर ते पाण्याच्या भांड्यात बुडवून ठेवावेत. हे पाणी रूम टेम्परेचर वर असावे . १ मिनिट पाण्यात डुंबून झाले की हलक्या हाताने दाब देऊन या पकोड्यातील अधिकचे पाणी काढून टाकावे .असे केल्याने पकोडे आतूनही मऊ होतात आणि काढी चांगली आतपर्यंत मुरते . खूप जोरात दाबून भजीचा कुस्कर करू नये .
कढीला चांगले ४५ मिनिटे शिजवल्यावर ती दाटसर होते . आता या कढीत आपण पकोडे घालायचे व फक्त २ मिनिटे झाकून मुरू द्यायचे . नंतर गॅस बंद करावा.
बाजूला कढीच्या फोडणीसाठी एका तडका पॅन मध्ये २ टेबलस्पून तूप गरम करावे . त्यात सुक्या मिरच्या परतून घ्याव्यात . ही चुरचुरीत फोडणी कढीवर घालावी आणि कढी वाढेपर्यंत झाकून ठेवावी म्हणजे ती मुरते . कढी वाढताना नेहमी हलकी गरम अशी वाढावी .
कढी पकोडा भातासोबत किंवा गरमागरम फुलके, पराठ्यांसोबत वाढावा !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/kadhi-pakoda-a-tangy-yogurt-based-gravy-with-gram-flour-in-marathi/