चेट्टीनाड वेंगाया कोस /कोसू - Chettinad Onion Curry - Chettinad Vengaya Kose - A perfect side dish for Idli and Dosa
Author: 
Recipe type: Accompaniment
Cuisine: Indian
 
कितीजणांना पुरेल : ४ ते ५ तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे शिजवण्यासाठी वेळ : २५ मिनिटे
Ingredients
  • साहित्य:
  • ४ मोठ्या आकाराचे कांदे = ३२५ ग्रॅम्स , लांब पातळ चिरून ,
  • १ मोठा बटाटा = १६० ग्रॅम्स , जुलियन्स मध्ये चिरून , माचीस च्या काड्यांप्रमाणे उभट आयताकृती आकारात
  • ३ मध्यम आकाराचे टोमॅटो = २०० ग्रॅम्स बारीक चिरून
  • २ टेबलस्पून तिखट लाल मिरची पूड
  • २ टेबलस्पून किसलेले ओले खोबरे
  • १ इंच दालचिनीचा तुकडा
  • २ टीस्पून बडीशेप
  • मीठ चवीनुसार
  • तेल
  • १०-१२ कढीलिंबाची पाने
Instructions
  1. कृती:
  2. टोमॅटो , लाल मिरची पूड , १ टीस्पून बडीशेप आणि खोबरे साधारण पाव कप पाणी घालून बारीक वाटून घ्यावे .
  3. ३ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात उरलेली १ टीस्पून बडीशेप , दालचिनी , कढीलिंब यांची फोडणी करून घ्यावी . नंतर चिरलेला कांदा घालून मऊ होईपर्यंत परतून घ्यावा .
  4. ५ मिनिटांनी बटाटा घालावा आणि नीट परतून घ्यावा . झाकण घालून मंद आचेवर शिजवून घ्यावेत .
  5. पाचेक मिनिटांनी बटाटे मऊ झाल्यावर त्यात वाटलेला मसाला घालावा , नीट एकत्र करून घ्यावा . मध्यम आचेवर मसाला चांगला शिजवून घ्यावा .
  6. मसाला शिजला की त्यात ३ कप गरम पाणी घालून ढवळून घ्यावे . चवीपुरते मीठ घालावे .
  7. मध्यम आचेवर एक उकळी आली की झाकण घालावे आणि मंद आचेवर भाजी शिजू द्यावी .
  8. दहा मिनिटांनंतर झाकण काढून पाणी जरासे आटले नी भाजी मसालेदार दिसू लागली की गॅस बंद करावा .
  9. ही वेंगाया कोसू इडली डोशासोबत अप्रतिम लागतेच , कधी पोळीसोबत डब्यात घेऊन जा , हिच्या सुगंधानेच भूक खवळते यात शंकाच नाही !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/chettinad-vengaya-kosu-in-marathi-chettinad-onion-curry/