चेट्टीनाड वेंगाया कोस /कोसू - Chettinad Onion Curry - Chettinad Vengaya Kose - A perfect side dish for Idli and Dosa
Author: Smita Mayekar Singh
Recipe type: Accompaniment
Cuisine: Indian
कितीजणांना पुरेल : ४ ते ५ तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे शिजवण्यासाठी वेळ : २५ मिनिटे
Ingredients
साहित्य:
४ मोठ्या आकाराचे कांदे = ३२५ ग्रॅम्स , लांब पातळ चिरून ,
१ मोठा बटाटा = १६० ग्रॅम्स , जुलियन्स मध्ये चिरून , माचीस च्या काड्यांप्रमाणे उभट आयताकृती आकारात
३ मध्यम आकाराचे टोमॅटो = २०० ग्रॅम्स बारीक चिरून
२ टेबलस्पून तिखट लाल मिरची पूड
२ टेबलस्पून किसलेले ओले खोबरे
१ इंच दालचिनीचा तुकडा
२ टीस्पून बडीशेप
मीठ चवीनुसार
तेल
१०-१२ कढीलिंबाची पाने
Instructions
कृती:
टोमॅटो , लाल मिरची पूड , १ टीस्पून बडीशेप आणि खोबरे साधारण पाव कप पाणी घालून बारीक वाटून घ्यावे .
३ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात उरलेली १ टीस्पून बडीशेप , दालचिनी , कढीलिंब यांची फोडणी करून घ्यावी . नंतर चिरलेला कांदा घालून मऊ होईपर्यंत परतून घ्यावा .
५ मिनिटांनी बटाटा घालावा आणि नीट परतून घ्यावा . झाकण घालून मंद आचेवर शिजवून घ्यावेत .
पाचेक मिनिटांनी बटाटे मऊ झाल्यावर त्यात वाटलेला मसाला घालावा , नीट एकत्र करून घ्यावा . मध्यम आचेवर मसाला चांगला शिजवून घ्यावा .
मसाला शिजला की त्यात ३ कप गरम पाणी घालून ढवळून घ्यावे . चवीपुरते मीठ घालावे .
मध्यम आचेवर एक उकळी आली की झाकण घालावे आणि मंद आचेवर भाजी शिजू द्यावी .
दहा मिनिटांनंतर झाकण काढून पाणी जरासे आटले नी भाजी मसालेदार दिसू लागली की गॅस बंद करावा .
ही वेंगाया कोसू इडली डोशासोबत अप्रतिम लागतेच , कधी पोळीसोबत डब्यात घेऊन जा , हिच्या सुगंधानेच भूक खवळते यात शंकाच नाही !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/chettinad-vengaya-kosu-in-marathi-chettinad-onion-curry/