पास्ता इन पिंक सॉस - Valentine Special - Pasta In Pink Sauce
Author: 
Recipe type: Main
Cuisine: Italian
 
कितीजणांना पुरेल : २ ते ३ तयारीसाठी वेळ : १० मिनिटे शिजवण्यासाठी वेळ : २० मिनिटे
Ingredients
 • १ कप = १०० ग्रॅम्स पेन्ने पास्ता ( किंवा तुमच्या आवडीचा कोणताही पास्ता जसे मॅकरोनी, फार्फाले )
 • १०० ग्राम भाज्यांचे तुकडे ( ब्रोकोली , लाल आणि पिवळी भोपळी मिरची )
 • १ लहान कांदा = ५० ग्रॅम्स ( लहान चौकोनी तुकड्यांत चिरून )
 • १ लहान टोमॅटो = ७० ग्रॅम्स ( लहान चौकोनी तुकड्यांत चिरून)
 • १/३ कप = ७० ml फ्रेश क्रीम
 • २ मध्यम आकाराचे टोमॅटो = १८० ग्रॅम्स प्युरी करून
 • ऑलिव्ह ऑइल
 • मीठ चवीनुसार
 • अर्धा टीस्पून व्हाईट पेपर पावडर / पांढरी मिरी पावडर
 • २-३ ऑलिव्ह चिरून
 • १ टीस्पून बटर
 • १ टेबलस्पून टोमॅटो केचअप
 • ४-५ लसणीच्या पाकळ्या ( बारीक चिरून )
 • अर्धा टीस्पून चिल्ली फ्लेक्स
 • १ प्रोसेस चीज क्युब
 • बेसिल लीव्हस २-३
Instructions
 1. एका कढईत १ कप पास्ता शिजवण्यासाठी ५ कप पाणी उकळत ठेवावे . त्यात २ टीस्पून ऑलिव्ह ऑइल आणि १ टेबलस्पून मीठ घालावे . जसे पाणी उकळू लागले की त्यात पास्ता घालावा . Durum wheat पास्त्याला १२ ते १५ मिनिटे शिजायला लागतात . पास्ता होईपर्यंत भाज्या शिजवून घेऊ .
 2. दुसऱ्या भांड्यात पण उकळत ठेवावे , त्यात १ टीस्पून साखर घालावी . भाज्या ( ब्रोकोली आणि भोपळी मिरच्या ) घालाव्यात. फक्त २ मिनिटांसाठी शिजवावे . नंतर गरम पाण्यातून काढून बर्फाच्या पाण्यात घालावे म्हणजे भाज्यांचा रंग नी टेक्श्चर चांगले राहते .
 3. पास्ता आपण १३ मिनिटे शिजवून घेतला आहे , हा आता "Al -Dente " म्हणजे " to -the -bite " शिजला आहे . पास्ता पाण्यातून काढून एका मोठ्या ताटात पसरवून ठेवावा आणि त्यावर काही तेल शिंपडावे म्हणजे एकमेकांना चिकटत नाही .
 4. एका पॅन मध्ये २ टेबलस्पून तेल घालावे . थोडे बटर घालून वितळू द्यावे . चिरलेला कांदा घालून मऊ होई पर्यंत परतावा .
 5. नंतर बारीक चिरलेला लसूण घालून जरासा गुलाबी होऊ द्यावा . नंतर चिरलेले टोमॅटो , टोमॅटोची प्युरी आणि थोडे मीठ घालावे . टोमॅटो जरा मऊ होईपर्यंत शिजू द्यावेत .
 6. २-३ मिनिटानंतर टोमॅटो केचअप , चिल्ली फ्लेक्स आणि किसलेले चीज घालून नीट एकत्र करून घ्यावे .
 7. सगळे साहित्य एकत्र करून घेतल्यावर फ्रेश क्रीम घालावी . त्याआधी गॅस बंद करावा . मग क्रीम घोटून मिक्स करावी म्हणजे क्रीम फाटत नाही .
 8. नंतर गॅस परत सुरु करावा , आपला पिंक सॉस तयार आहे . त्यात पांढरी मिरी पावडर , बेसिल ची पाने हाताने बारीक खुडून एकत्र करून घ्यावीत . बेसिल आणि पांढरी मिरी घालताना नेहमी प्रमाणात घालावी , जास्त झाली तर त्यांचा सुगंध पास्त्यात फार जास्त येतो .
 9. आता शिजवलेल्या भाज्या घालून सॉस मध्ये एकत्र करून घ्याव्यात . नंतर बॉइल्ड पास्ता घालून फक्त टॉस करावा . खूप वेळ शिजवू नये . पास्ता इन पिंक सॉस तयार आहे !
 10. हा पास्ता वरून ऑलिव्हज आणि बेसिल च्या फ्रेश पानांनी सजवून गरमागरम खायला द्यावा !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/valentine-special-pasta-in-pink-sauce-in-marathi/