किती बनतील : ८ ते १० तयारीसाठी वेळ : १२ तास बनवण्यासाठी वेळ : ३० मिनिटे
Ingredients
साहित्य:
१ कप - २०० ग्रॅम्स लहान दाण्यांचा तांदूळ ( इंद्रायणी / बासमती तुकडा/ आंबेमोहोर )
अर्धा कप = १०० ग्रॅम्स उडीद डाळ
२ टेबलस्पून = २० ग्रॅम्स चण्याची डाळ
पाव कप = ३० ग्रॅम्स पोहे
१ टीस्पून मीठ
पाव टीस्पून मेथी दाणे
तेल
पाणी गरजेनुसार
७० ग्रॅम्स शेपू ( सव्वा ते दीड कप )
३ हिरव्या मिरच्या
अर्धा कप = ४० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
दीड ते दोन टेबलस्पून गूळ
Instructions
कृती:
पोळ्याच्या मिश्रणासाठी सगळे साहित्य तांदूळ , डाळी आणि पोहे स्वच्छ पाणी निघेपर्यंत चौ घ्यायचे आहे .
नंतर मेथीचे दाणे तांदळासोबत भिजवत ठेवावे आणि डाळी सुद्धा पाण्यात बुडेपर्यंत सहा ते ८ तासांसाठी भिजवाव्यात ! पोहे वाटायच्या आधी १ तास भिजवले तरीही चालतील .
८ तासानंतर तांदूळ नी डाळींतील पाणी काढून टाकावे . मिक्सरमधून हे सगळे पाणी घालून बारीक वाटून घ्यावे .
पाऊण कप पाणी घालून मिश्रण आपण वाटून घेतले आहे . एका खोलगट भांड्यात काढून हाताने एकाच दिशेने ३-४ मिनिटे गोलाकार फिरवत नीट ढवळून घ्यावे .
हे मिश्रण सरसरीत असावे . नंतर झाकण घालून ८ ते १० तासांसाठी झाकून आंबवण्यास ठेवावे.
जेव्हा शेपूचे पोळे करायला घ्यायचे आहेत तेव्हा शेपूची पाने आणि कोवळी देठे , ओले खोबरे , मीठ आणि गूळ अर्धा कप पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावेत .
पोळ्यांचे मिश्रण ८ तासांत चांगले फुलते . त्यात शेपूची पेस्ट घालावी . मिश्रण सरसरीत असले तर पाणी घालून नये .
एका भिड्यावर/ काहिलीवर किंवा नॉनस्टिक तव्यावर थोडे तेल पसरवून गरम करून घ्यावे . नंतर आच मध्यम करून दीड ते दोन डाव मिश्रण मध्यभागी घालून गोलाकार पसरवावे . पोळे थोडे जाडच घालावेत . झाकण घालून २ मिनिटे होऊ द्यावेत .
नंतर बाजू उलटून पोळे दुसऱ्या बाजूने देखील शिजवून घयावे .
गरम गरम शेपूचे पोळे चटणीसोबत किंवा उसळीसोबत खायला द्यावेत .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/shepuche-pole-shepeche-pole-shepu-dosa-dill-leaves-pancake/