स्वयंपाकाची पूर्वतयारी - वर्षभरासाठी मटार फ्रिजमध्ये न खराब होता कसे साठवून ठेवावेत ?
Author: 
Recipe type: Main
Cuisine: Indian
 
Ingredients
  • साहित्य :
  • २ किलो मटार सोलून त्याचे दाणे वजनात साधारण ९०० ग्रॅम्स
  • १ टीस्पून साखर
  • मोठी कढई - मटार उकळण्यासाठी
  • खोलगट भांडे - बर्फाच्या पाण्यात बुडवून ठेवण्यासाठी
  • मोठी गाळणी
  • मटार साठवण्यासाठी झिपलॉक बॅग्स किंवा चांगल्या प्लॅस्टिकच्या जाड पिशव्या
Instructions
  1. एका मोठ्या कढईत ३ लिटर पाणी उकळत ठेवावे . तुमच्या कढईच्या आकाराप्रमाणे पाणी कमी जास्त करावे , एवढेच की मटार पाण्यात पूर्णपणे बुडले पाहिजेत .
  2. पाण्याला चांगली उकळी आली की मटार आणि साखर घालावी . साखरेने मटारचा हिरवा रंग शाबूत राहतो .
  3. आपण हे मटार उकळत्या पाण्यात २ मिनिटे राहू देणार आहोत जोपर्यंत ते हलके होऊन पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू लागत नाहीत !
  4. दोन मिनिटांनी गॅस बंद करावा .
  5. मटार गाळणीतून गाळून बर्फ टाकलेल्या पाण्याने भरलेल्या भांड्यात पटकन टाकावेत .
  6. बर्फ़ाळ पाण्यात हे मटार २ मिनिटे राहू द्यावेत . नंतर गाळणीतून गाळून एका परातीत उपसून काढावेत .
  7. जरासे पाणी हडकले की हे मटार झिपलॉक बॅग्स मध्ये अर्धे अर्धे भरावेत , प्रत्येकी ४५० ग्रॅम्स !
  8. नंतर त्या बॅग्स वर तारीख लिहून फ्रीझरमध्ये ठेवाव्यात . अशा प्रकारे साठवलेले मटार ६ ते ८ महिन्यांसाठी किंबहुना वर्षभरासाठी पुढचा मटार सीझन येईपर्यंत व्यवस्थित राहतात .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/how-to-blanch-and-freeze-peas-in-marathi/