ससुराल की रसोई - साग आलू - पालक बटाटा भाजी
Author: 
Recipe type: Main
Cuisine: Indian
 
कितीजणांना पुरेल : ४ ते ५ तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे शिजवण्यासाठी वेळ : २० मिनिटे
Ingredients
  • साहित्य:
  • मोहरी तेल किंवा तुमच्या घरात वापरले जाणारे खाद्यतेल
  • १२ ते १५ लसणीच्या पाकळ्या
  • ५ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  • चिमूटभर हळद
  • अर्धा किलो बटाटे मोठे तुकडे करून
  • शेपू बारीक चिरलेला ६० ग्रॅम्स
  • पालक बारीक चिरलेला ३०० ग्रॅम्स
  • मीठ चवीनुसार
Instructions
  1. कृती :
  2. कढईत २ ते ३ टेबलस्पून मोहरीचे तेल चांगले तापवून घ्यावे . त्यात बारीक चिरलेला लसूण घालून खरपूस होऊ द्यावा .
  3. नंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून परतून घ्याव्यात . हळद घालून परतून घ्यावी . बटाट्याचे तुकडे घ;ऊन २-३ मिनिटे मोठ्या आचेवर परतून घ्यावेत .
  4. त्यानंतर शेपू नी पालक घालावा . नीट एकत्र करून घ्यावा . मंद आचेवर झाकण घालून बटाटे पूर्ण शिजेपर्यंत ठेवावे .
  5. सगळ्यात शेवटी मीठ घालावे आणि भाजी कोरडी होऊ द्यावी . आचेवरून उतरवावी .
  6. गरम गरम फुलके , मक्याची रोटी किंवा वरण भातासोबत वाढावी .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/saag-aloo-palak-batata-recipe-in-marathi/