अर्धा किलो मध्यम आकाराचे बांगडे ( २-३ तुकडे करून )
अर्धा टीस्पून हळद
मीठ
१ मोठा कांदा ( १०० ग्रॅम्स ) - लांब चिरून ,
अर्धा इंच आल्याचा तुकडा
५-६ लसणीच्या पाकळ्या
२ टीस्पून बडीशेप
१ टेबलस्पून धणे
२ मोठे टोमॅटो ( १५० ग्रॅम्स) तुकडे करून
२ टीस्पून काश्मिरी सुक्या लाल मिरच्या
१ कप = ८५ ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
७-८ सुक्या बेडगी लाल मिरच्या
तेल
१ टीस्पून मोहरी
१० -१२ कढीलिंबाची पाने
४-५ कोकमं
Instructions
कृती :
धुतलेल्या बांगड्यांच्या तुकड्यांना हळद आणि मीठ चोपडून घ्यावे व काही वेळ तसेच बाजूला मुरत ठेवावे .
तेल , मोहरी , कढीपत्ता , मीठ, कोकमं सोडून बाकी सारे साहित्य साधारण १ कप पाणी घालुन मिक्सरमधून किंवा पाट्यावर बारीक गंधासारखे वाटून घ्यावे .
एका कढईत २-३ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात मोहरी , कढीलिंबाची फोडणी करावी . नंतर वाटलेला मसाला घालून चांगला परतून घ्यावा . हा कच्चा मसाला असल्याकारणाने परतताना अर्धा कप पाणी घालून झाकण घालून शिजवून घ्यावा .
साधारण दहा मिनिटांत मसाला शिजला की त्यात सुमारे ३ कप गरम पाणी घालावे . मध्यम आचेवर एक उकळी येऊ द्यावी . नंतर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी .
आच मंद करून कढईच्या कडेने माशाचे तुकडे अलगद कालवणात सोडावेत . झाकण घालून मंद आचेवर शिजू द्यावे.
साधारण ३ ते ४ मिनिटांत मासा शिजतो . कोकमं घालावीत नी १-२ मिनिटे अजून कालवण शिजू द्यावे.
चवीपुरते मीठ घालून ढवळावे .
बांगड्याचे कालवण गॅसवरून खाली उतरवावे नी झाकण घालून जरासे मुरल्यावर वाढायला घ्यावे .