कोकणात बनवली जाणारी चविष्ट कापं - कुरकुरीत वांग्याचे व सुरणाचे काप
Author: 
Recipe type: Sides
Cuisine: Indian
Prep time: 
Cook time: 
Total time: 
Serves: 3-4
 
Ingredients
  • वांग्याचे काप
  • साहित्य :
  • १ मोठ्या आकाराचे वांगे - धुऊन , अर्धा ते एक सेंटिमीटर च्या जाडीच्या चकत्या कापून
  • १ टीस्पून मीठ
  • १ टीस्पून हळद
  • २ टीस्पून लिंबाचा रस
  • ६ टेबलस्पून तांदळाचे पीठ
  • दीड टेबल्स्पूनन रवा
  • ३ टेबलस्पून मालवणी मसाला
  • तेल
  • सुरणाचे काप
  • साहित्य :
  • अर्धा किलो सुरण - साल काढून , स्वच्छ धुऊन . मध्यम जाडीचे तुकडे करून
  • ६ टेबलस्पून तांदळाचे पीठ
  • ४ टेबल्स्पून मालवणी मसाला
  • १ टीस्पून चिंच - ३ टेबलस्पून गरम पाण्यात भिजवून
  • चवीपुरते मीठ
  • तेल
Instructions
  1. कृती : वांग्याचे काप
  2. वांग्याचे काप काळे पडू नयेत म्हणून एका पाण्याने भरलेल्या भांड्यात मीठ घालून त्यात दहा मिनिटांसाठी बुडवून ठेवावेत .
  3. एका ताटलीत हळद व लिंबाचा रस एकत्र करून घ्यावा . वांग्याच्या प्रत्येक चकतील नीट चोळून लावावा . असेच दहा मिनिटांसाठी बाजूला मुरत ठेवावे .
  4. पिठाच्या मिश्रणासाठी तांदळाचे पीठ , रवा , मालवणी मसाला आणि मीठ घालून एकत्र मिसळून घ्यावे . यातले लागेल तेवढेच मिश्रण आपण वापरणार आहोत , नाहीतर सगळे मिश्रण ओलसर होते.
  5. वांग्याची एकेक चकती दाबून या पिठात दोन्ही बाजूंनी घोळवावी .
  6. पसरट तव्यावर किंवा काहिलीवर तेल चांगले तापवून घ्यावे . मंद आचेवर तव्यावर अलगद कापे पसरवून दोन्ही बाजूंनी चुरचुरीत होईपर्यंत तळावीत .
  7. ही कापे बेकरीच्या लुसलुशीत पावात घालून सुद्धा अतिशय छान लागतात , अर्थात मी माझी आवड सांगितली बरं का !
  8. कृती : सुरणाचे काप
  9. एका कढईत १ ते दीड लिटर पाणी आणि १-२ टीस्पून मीठ घालून उकळत ठेवावे . त्यात सुरणाचे तुकडे घालून साधारण १० मिनिटे उकडून घ्यावेत . अति नरम होऊन तुटेपर्यंत शिजवू नयेत .
  10. शिजलेले सुरणाचे तुकडे एका ताटलीत काढून घ्यावेत . त्यांना चिंचेचा कोळ लावून घ्यावा आणि १५ मिनिटांसाठी मुरत ठेवावेत .
  11. तांदळाचे पीठ , मालवणी मसाला आणि मीठ एकत्र मिसळवून घ्यावे . त्यात हे तुकडे व्यवस्थित दाबून घोळवून घ्यावेत .
  12. तव्यावर तेल चांगले तापवून नंतर मंद आचेवर सुरणाचे काप दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावेत .
  13. हे सुरणाचे काप म्हणजे श्रावणात मत्स्याहार वर्ज्य असताना खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अतिशय उत्तम !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/konkani-vangi-and-suran-kaape/