चमचमीत कोकणी पद्धतीची गवार व काळ्या वाटाण्याची रस्सा भाजी
Author: 
Recipe type: Main
Cuisine: Indian
 
Ingredients
  • कितीजणांना पुरेल : ३ ते ४
  • तयारीसाठी वेळ : ८ ते १० तास ( वाटाणे भिजवण्यासाठी )
  • शिजवण्यासाठी वेळ: ४५ मिनिटे
  • साहित्य:
  • १ कप = २०० ग्रॅम्स काळे वाटाणे मोड काढून
  • चवीनुसार मीठ
  • अर्धा कप = ५० ग्रॅम्स किसलेले सुके खोबरे
  • तेल
  • ७-८ लसणीच्या पाकळ्या
  • २ लहान कांदे = १०० ग्रॅम्स लांब चिरलेले
  • अर्धा कप ताजी कोथिंबीर
  • पाव टीस्पून हिंग
  • ८ -१० कढीलिंबाची पाने
  • १ टीस्पून हळद
  • ३ टेबलस्पून मालवणी मसाला
  • २५० ग्रॅम्स गवारीच्या शेंगा , धुऊन अर्धा इंचाचे तुकडे करून
  • १०० ग्रॅम्स टोमॅटो प्युरी
  • २ टीस्पून गूळ
Instructions
  1. कृती:
  2. काळे वाटाणे २ कप पाण्यात १ टीस्पून मीठ घालून प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्यावेत .
  3. सुके खोबरे एका कढईत खरपूस भाजून घ्यावे . त्याच कढईत २ टेबलस्पून तेल घालून गरम करून घ्यावे . त्यात लसूण घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावी .
  4. चिरलेला कांदा घालून खरपूस परतून घ्यावा . नंतर कोथिंबीर घालून व्यवस्थित परतून घ्यावी. भाजलेले खोबरे घालून नीट एकत्र करून घ्यावे . गॅस वरून उतरवून थंड होऊ द्यावे . साधारण पाऊण कप पाणी वापरून वाटण बारीक करून घ्यावे .
  5. कढईत ३ टेबल्स्पून तेल घालून गरम करावे . त्यात हिंग , कढीलिंबाची फोडणी करावी . नंतर ;हळद, आणि मालवणी मसाला घालून १-२ मिनिटे परतून घ्यावे . वाटण घालून अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे .
  6. मसाला शिजला की त्यात गवार घालून १ कप गरम पाणी घालावे . झाकून शिजू द्यावी .
  7. दहा मिनिटानंतर शिजलेले काळे वाटाणे घालून एकत्र करून घ्यावेत . टोमॅटो प्युरी घालावी , अर्धा कप गरम पाणी घालावे . झाकून मंद आचेवर शिजू द्यावे .
  8. भाजी शिजत आली की त्यात गूळ आणि चवीपुरते मीठ घालावे .
  9. गरमागरम घडीची पोळी , फुलके , तांदळाची / नाचणीची भाकरी, वडे किंवा भातासोबत उत्कृष्ट लागते !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/konkani-gawar-kala-vatana-mix-bhaji/