बांगड्याचे आमसुलातले सुके - बांगड्याचे सुके - A comforting Sunday Meal
Author: 
Recipe type: Main
Cuisine: Indian
 
Ingredients
  • कितीजणांना पुरेल : ४-५
  • तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे
  • शिजवण्यासाठी वेळ : १५ मिनिटे
  • साहित्य:
  • ४०० ग्रॅम्स लहान आकाराचे बांगडे - बांगडुले , स्वच्छ धुऊन , साफ करून , दोन तुकडे करून घ्यावेत ( अगदीच लहान असेल तर अख्खा ठेवलात तरी चालेल )
  • दीड इंच आल्याचा तुकडा
  • १२-१५ लसणीच्या पाकळ्या
  • ५-६ हिरव्या मिरच्या
  • अर्धा कप कोथिंबीर
  • पाव कप किसलेले ओले खोबरे
  • १० बेडगी सुक्या लाल मिरच्या ( रंग उत्तम येतो )
  • ८ कोकमं ( आंबटपणाच्या चवीनुसार कमी जास्त घ्यावीत )
  • १० -१२ कढीलिंबाची पाने
  • १ टीस्पून धणे
  • पाव टीस्पून तिरफळे
  • अर्धा पाव टीस्पून मेथी
  • सव्वा टीस्पून हळद
  • मीठ चवीनुसार
  • तेल
Instructions
  1. कृती:
  2. सर्वप्रथम बांगड्यांच्या तुकड्यांना हळद आणि थोडे मीठ व्यवस्थित चोपडून घ्यावे . थोडी हळद वाटणासाठी बाजूला काढून ठेवावी . बांगडे हळद मिठात १५ मिनिटे मुरू द्यावेत .
  3. अर्धा कप गरम पाण्यात आमसुले/कोकमं भिजत घालावीत .
  4. इतर सगळे साहित्य ( कढीलिंब, तेल व मीठ सोडून ) मिक्सरमधून किंवा पाट्यावर थोडे पाणी घालून गंधासारखे बारीक वाटून घ्यावे . साधारण अर्धा कप पाणी मी वाटणात वापरले आहे .
  5. एका कढईत अडीच टेबलस्पून तेल गरम करून त्यात कढीलिंबाची फोडणी करावी . त्यात वाटलेला मसाला व मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप पाणी घालून मिसळावे . हा मसाला तेलात चांगला शिजेपर्यंत झाकून शिजवावा . साधारण ८ मिनिटे लागतात .
  6. मसाला शिजला की त्यात पाव कप पाणी घालावे . हे सुक्के मसालेदार असते , म्हणून त्यात अति पाणी घालू नये . एकेक बांगड्याचा तुकडा या मसाल्यात नीट लावून घ्यावा . चमच्याने जोरजोरात हलवू नये नाहीतर मासे तुटतात . झाकून शिजू द्यावेत .
  7. साधारण ३ मिनिटांत मासे शिजत येतात . यात आता भिजवलेली कोकमं पाण्यात चुरून , त्या पाण्यासकट मिसळून द्यावीत . चवीपुरते मीठ घालावे . झाकून अजून दोन मिनिटे सुक्के शिजू द्यावे म्हणजे सगळ्या चावी एकत्र मिळून येतील .
  8. पूर्ण पाच मिनिटे शिजून आपले बांगड्यातले आमसुलातले सुक्के तयार आहे . झाकण घालून थोडा वेळ मुरल्यानांतरच हे वाढायला घ्यावे म्हणज अजून चविष्ट लागते .
  9. गरमगरम भात , नाचणी किंवा तांदळाची भाकरी यासोबत अप्रतिम लागते हे बांगड्याचे सुक्के !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/konkani-bangda-sukke/