दिवाळी विशेष फराळ - तोंडात विरघळणारे बिनपाकाचे रव्याचे लाडू
Author: 
Recipe type: Dessert
Cuisine: Indian
 
Ingredients
  • तयारीसाठी वेळ: २० मिनिटे
  • बनवण्यासाठी वेळ : ३० मिनिटे
  • किती बनतील : २०-२५
  • साहित्य:
  • २ १/२ कप = ५०० ग्रॅम्स बारीक रवा
  • २२५ ग्रॅम्स तूप ( वितळवून )
  • १ टेबलस्पून बदामाचे काप
  • १ टेबलस्पून काजूचे तुकडे
  • १ टेबलस्पून चारोळे
  • १ टेबलस्पून मनुका
  • ५-६ हिरव्या वेलच्या कुटून, जाडसर पावडर करून
  • १ १/४ कप पिठीसाखर ( २५० ग्रॅम्स )
Instructions
  1. कृती:
  2. आपल्याला एका जाड बुडाच्या कढईत तुपात रवा बॅचेस मध्ये भाजून घ्यायचा आहे . थोडे थोडे तूप घालून मंद आचेवर रवा भाजावयास सुरुवात करावी . रवा सोनेरी रंगावर भाजायचा आहे , अजिबात तपकिरी होऊ दयायचा नाही , नाहीतर लाडू दिसायला चांगले राहणार नाहीत .
  3. रवा भाजताना कोरडा दिसू लागला की अजून तूप घालावे . असे करून आपण रव्याची एक बॅच १० मिनिटे सोनेरी रंगावर भाजून घेतली आहे . भाजलेला रवा पूर्ण थंड झाल्यावर एका हवाबंद डब्यात ठेवून किमान एक दिवस ठेवावा म्हणजे तूप त्यात चांगले मुरते. हा रवा ३-४ दिवस ठेवून तुम्ही त्यानंतरही लाडू बांधायला घेऊ शकता .
  4. ज्या दिवशी लाडू बांधायचे आहेत , त्या दिवशी १-२ टेबलस्पून तुपात बदाम, काजू नी चारोळे हलके परतून घ्यावेत . मनुका तुपात परतू नयेत.
  5. एका परातीत डब्यात ठेवलेला रवा काढून घ्यावा आणि हाताने मोकळा करून घ्यावा . त्यात पिठीसाखर , वेलची पावडर घालून हाताने व्यवसहित मिक्स करून घ्यावी . आता तुपात परतलेले बदाम, काजू आणि चारोळे तसेच मनुका घालाव्यात . नीट एकत्र करून घ्यावे .
  6. आता रव्याच्या मिश्रणाचे २ भाग करावेत , आणि एका भागात थोडे थोडे कोमट तूप मिसळून आपल्याला आवडतील त्या आकारात लाडू घट्ट वळून घ्यावेत . पहिल्यांदा लाडू कोरडे वाटले तरी लाडू वळले जातात .
  7. हे लाडू खराब न होता चांगले महिनाभर टिकतात !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/rava-laddoo/