एका जाड बुडाच्या कढईत किंवा नॉन स्टिक कढईत दूध मोठ्या आचेवर उकळत ठेवावे . दुधाला एक उकळी आली की आच मंद करून आटू द्यावे .
दूध गरम होत असताना मधून मधून सारखे ढवळत राहावे आणि कढईच्या कडेला चिकटलेली साय सुद्धा दुधात मिसळावी म्हणजे दूध दाट होते . तसेच दूध आटत असताना गॅस पासून दूर जाऊ नये नाहीतर दूध जरासे लागले /करपले तर खव्याची चव बिघडते .
आपल्याला दूध १/५ भागापर्यंत येईपर्यंत आटवायचे आहे .
साधारण ५५ मिनिटांत दूध रबडी प्रमाणे दिसू लागते . यापुढे आटवून साधारण पूर्ण १ तास आणि १५ मिनिटांत खव्याचा गोळा होऊ लागतो . कढईचे बूड सोडून हा खवा कडांनी तूप सोडू लागतो ! आता समजावे की खवा तयार झालाय . या उप्पर खवा शिजवल्यास तो दाणेदार होऊ लागतो आणि त्याचा मऊसूत पणा निघून तो कडक होऊ लागतो .
हा खवा एका ताटलीत किंवा डब्यात काढून पूर्ण थंड होऊ द्यावा आणि आपल्या पाककृतीत जसे गुलाबजाम, मावा कपकेक , खीर यांमध्ये वापरू शकतो . लगेच वापरायचा नसेल तर फ्रिजमध्ये ४-५ दिवस ठेवून आपण तो वापरु शकतो .
१ लिटर दुधाचा साधारण २२५ ग्राम खवा मिळतो .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/how-to-make-khoa-at-home/