HOW TO MAKE BATATYACHE KAAP -FRIED AND CRISPY POTATO SLICES-उपवास विशेष बटाट्याची कापे
Author: 
Recipe type: Main
Cuisine: Indian
 
कितीजणांना पुरेल : ३ ते ४ तयारीसाठी वेळ : १० मिनिटे बनवण्यास वेळ : २५ मिनिटे
Ingredients
  • ४ मध्यम आकाराचे बटाटे ( ४०० ग्रॅम्स )
  • ४ टेबलस्पून वरीच्या तांदळाचे पीठ ( भगर )
  • दीड टेबलस्पून लाल मिरची पूड ( तिखट आवडीनुसार , मी काश्मिरी मिरची पूड घेतलीय )
  • १ टीस्पून भाजलेली जिरे पूड
  • सैंधव मीठ किंवा नेहमीचे मीठ चवीनुसार
  • तेल
Instructions
  1. बटाटयाच्या साली काढून स्वच्छ धुऊन घ्यावेत .
  2. मध्यम जाडीच्या बटाट्याच्या चकत्या करून घ्याव्यात . फार पातळ चकत्या करू नयेत , त्या लवकर करपतात .
  3. एका ताटलीत वरईचे पीठ , लाल मिरची पूड, जिरे पावडर आणि सैंधव मीठ एकत्र मिसळून घ्यावे .
  4. बटाट्याच्या चकत्या पाण्यातून बाजूला काढून घ्याव्यात . वरील मिश्रणात व्यवस्थित दाबून घोळवाव्यात .
  5. एका पसरट तव्यावर ५-६ टेबलस्पून तेल व्यवस्थित पसरवून मध्यम ते मोठया आचेवर गरम करून घ्यावे .
  6. नंतर आच मंद करावी . हे बटाट्याचे काप कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी तळून घ्यावेत .
  7. दोन्ही बाजूंनी कापांचा रंग सोनेरी दिसू लागतो तेव्हा हे एका ताटलीत काढून घ्यावेत .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/upwas-batatyache-kaap/