१ कप चिवळ किंवा चिवईची किंवा चिऊची भाजी , निवडून , स्वच्छ धुऊन
पाव कप = ५० ग्रॅम्स मूग डाळ
पाव कप = ५० ग्रॅम्स चणा डाळ
पाव कप = ५० ग्रॅम्स तूर डाळ
१ लहान कांदा = ६० ग्रॅम्स बारीक चिरून
पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर
१ इंच आल्याचा तुकडा
६-७ लसणीच्या पाकळ्या
६-७ हिरव्या मिरच्या
२ टीस्पून जिरे
पाव टीस्पून हिंग
अर्धा टीस्पून हळद
पाव टीस्पून लाल मिरची पूड
अर्धा टीस्पून तेल ( शेंगदाण्याचे तेल असल्यास उत्तम )
चवीपुरते मीठ
Instructions
कृती:
सगळ्या डाळी एकत्र करून ३-४ वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्याव्यात . नंतर ४ ते ५ तासांसाठी पाण्यात भिजू घालाव्यात .
चिवळ निवडून तिचे जून देठ मोडून , स्वच्छ धुऊन घ्यावी . यात बारीक अळ्या असण्याची शक्यता असते , म्हणून नीट पाण्यात खळखळून धुवावी . चाळणीत थोडा वेळ काढून तिचे पाणी निथळू द्यावे आणि नंतर बारीक चिरून घ्यावी .
डाळींतले पाणी काढून आले , मिरच्या , लसूण , आणि जिरे घालून बारीक वाटून घ्यावे . डाळी वाटताना पाण्याचा वापर करू नये . हे पेस्ट घट्टच असली पाहिजे .
एका बाऊलमध्ये डाळींची पेस्ट, चिवळ , कांदा , कोथिंबीर , हळद , लाल मिरची पूड , हिंग , मीठ आणि १-२ टीस्पून तेल घालून नीट एकत्र करून घ्यावे .
मोदक पात्रात किंवा पातेल्यात पाणी उकळत ठेवावे . तो पर्यंत या मिश्रणाचे आपल्याला हव्या त्या आकाराचे मुटके किंवा गोळे बनवावेत . हाताला थोडे से तेल लावावे म्हणजे चिकटत नाहीत . चाळणीत हे गोळे ठेवून १५ ते २० मिनिटे मंद ते मध्यम आचेवर उकडून घ्यावेत .
गरमागरम फुणके ताकाच्या कढीसोबत वाढावेत .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/khandeshi-bhendke-funake/