५०० ग्राम बासमती तांदूळ ( मोदक पिठीसाठी बासमती , आंबेमोहोर किंवा इंद्रायणी सारखा सुवासिक तांदूळ वापरावा. नेहमीच्या वापराच्या तांदूळ पिठीसाठी जाड आणि लहान दाण्यांचा तांदूळ वापरला तरी चालेल )
पाणी गरजेनुसार
Instructions
कृती :
तांदूळ निवडून , पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत . हे तांदूळ पाण्यात पूर्ण बुडतील इतके पाणी घालून ६ ते ८ तासांसाठी भिजू घालावेत . तांदूळ जास्त तासांसाठी भिजले तर त्यातून आंबूस वास यायला लागतो .
भिजलेले तांदूळ एका चाळणीत अर्धा तास काढून ठेवावेत .
नंतर एका स्वच्छ सुती कापडावर तांदूळ पसरवून ठेवावेत . एकमेकांना तांदळाचे दाणे चिकटणार नाहीत या रीतीने व्यवस्थित पसरवावेत . म्हणजे ते व्यवस्थित कोरडे होतात .
साधारण १० -१२ तासांसाठी हे तांदूळ सावलीत किंवा घरातच पंख्याखाली वाळवून घ्यावेत . चुकूनही ते उन्हात वाळवू नयेत . तांदूळ वाळवणे ही प्रक्रिया उन्हाळी वाळवणे नसून फक्त दाण्यांच्या बाहेरील ओलावा कोरडा व्हावा यासाठी आहे जेणेकरून दाण्यांच्या आत शोषल्या गेलेल्या पाण्यामुळे पिठी एकदम मऊसूत बनावी .
१०-१२ तासानंतर तांदूळ चांगले सुकले म्हणजे हाताला कोरडे लागले की त्यांची पिठी दळून घ्यावी .
मिक्सरमध्ये थोडे थोडे करून तांदूळ बारीक वाटावे आणि मैद्याची किंवा रव्याची जी बारीक चाळणी असते त्यातून चाळून घ्यावे किंवा वस्त्र गाळ पूड केली तरीही चालते . चाळणीत उरलेली तांदळाची कणी परत मिक्सरमधून बारीक करून घ्यावी .
हे पीठ चक्कीवरुन दळून आणायचे असल्यास ते बारीक च दळून आणावे .
हे साधारण ४७० ग्रॅम्स चे पीठ बनते . एका हवाबंद डब्यात ठेवल्यास २-३ महिने सहज टिकते .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/how-to-make-rice-flour-marathi/