Hirvya Vatanyachi Usal in Marathi- हिरव्या वाटाण्याची उसळ
Author: 
Recipe type: Main
Cuisine: Indian
Cook time: 
Total time: 
Serves: 3-4
 
Ingredients
कितीजणांसाठी बनेल : ३-४
तयारीसाठी आणि शिजवण्यासाठी वेळ : ६० मिनिट
साहित्य:
  • पाऊण कप = १५० ग्रॅम्स हिरवे वाटाणे - स्वच्छ धुऊन रात्रभर किंवा किमान ६ तास पाण्यात भिजवून
  • २ मध्यम आकाराचे बटाटे - १०० ग्रॅम्स - सालीसकट लांब चिरून
  • २ मध्यम आकाराचे टोमॅटो - १२५ ग्रॅम्स लांब चिरून फोडी करून
  • १ मध्यम आकाराचा कांदा - ८० ग्रॅम लांब चिरून
  • अर्धा कप - ५० ग्रॅम किसलेले ओले खोबरे
  • पाव कप कोथिंबीर
  • पाव कप - २५ ग्रॅम्स किसलेले सुके खोबरे
  • ८-१० लसणीच्या पाकळ्या
  • १ इंच आल्याचा तुकडा
  • ८-१० कढीपत्ता
  • अर्धा टीस्पून हिंग
  • १ लहान कांदा = ५० ग्रॅम्स बारीक चिरलेला
  • अर्धा टीस्पून हळद
  • तेल
  • मीठ चवीनुसार
  • दीड टेबलस्पून मालवणी मसाला ( GW Khamkar Brand स्पेशल मालवणी मसाला )
Instructions
कृती:
  1. वाटाणे शिजवण्यासाठी एका पॅनमध्ये २ कप पाणी उकळत ठेवावे . पाणी उकळले की त्यात अर्धा टीस्पून मीठ घालून भिजवलेले वाटाणे घालावेत . वाटाणे या पाण्यात शिजवून घ्यावेत ( १२ ते १५ मिनिटे )
  2. आता आपण वाटणाची तयारी करूया . एका कढईत सुके खोबरे खरपूस भाजून घ्यायचे आहे . भाजल्यावर खोबरे एका ताटलीत काढून घ्यायचेय .
  3. त्यानंतर त्याच कढईत २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात आले लसूण घालून चांगले गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे .
  4. आता लांब चिरलेला कांदा घालून खरपूस परतून घ्यावा ( ८-१० मिनिटे ) . नंतर कोथिंबीर जराशी तेलात परतून घ्यावी .
  5. आता यात किसलेले ओले खोबरे घालून जरासे २-३ मिनिटे परतून घ्यायचे . खूप ब्राऊन होउ देऊ नये नाहीतर ओल्या खोबऱ्याचा फ्रेशनेस भाजीत येणार नाही .
  6. आता भाजलेले सुके खोबरे घालून नीट एकत्र करावे . गॅस बंद करावा . हे भाजलेले वाटप थंड झाले की पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे .
  7. आता कढईत अडीच टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . यात कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी करून घ्यावी . त्यात बारीक चिरलेला कांदा घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावा .
  8. नंतर हळद घालून जरा परतून घ्यावी . आता मालवणी मसाला घालून तो जरासा तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा . थोडे पाणी घालावे म्हणजे करपणार नाही .
  9. आता वाटलेला मसाला व थोडे पाव कप पाणी घालून मसाला चांगला परतुन घयावा .
  10. १० मिनिटे व्यवस्थित मसाला परतल्यावर बटाट्याच्या फोडी आणि शिजवलेले वाटाणे घालून नीट एकत्र करून घ्यावे . त्यात साधारण दीड कप गरम पाणी घालावे . मध्यम आचेवर एक उकळी आली की गॅस मंद करावा व झाकण घालून उसळ शिजू द्यावी ( ८ ते १० मिनिटे )
  11. बटाटे शिजले की आता टोमॅटो घालावेत. झाकण घालून मंद आचेवर ६ ते ७ मिनिटे शिजवावेत .
  12. आता शेवटी चवीपुरते मीठ घालावे . गॅस बंद करावा . आपली उसळ वाढेपर्यंत झाकून ठेवावी . ही उसळ घडीच्या तेलावरच्या पोळ्या , फुलके , तांदळाची भाकरी , आंबोळी , घावणे तसेच भातासोबत खूप चविष्ट लागते .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/hirvya-vatanyachi-usal-marathi/