Dry Fruit Lassi in Marathi-ड्रायफ्रूट लस्सी-Gokul Ashtami special
Author: 
Recipe type: Drinks
Cuisine: Indian
 
Ingredients
साहित्य :
  • ३०० ग्रॅम्स घट्ट दही ( ६०० ग्राम दही एका मलमलच्या कापडात घट्ट बांधून २ तासांसाठी टांगून ठेवल्यावर पाण्याचा निचरा होऊन घट्ट दही मिळते )
  • १२५ ml थंड दूध
  • १०० ग्रॅम्स खवा किसून किंवा कुस्करून
  • ४ टेबलस्पून साखर ( ६० ग्रॅम्स) किंवा आवडीनुसार
  • अर्धा कप सुका मेवा ( काजू , बदाम , पिस्ता , मनुका चिरून )
Instructions
कृती :
  1. एका पॅन मध्ये मंद आचेवर खवा हलक्या तांबूस रंगावर भाजून घ्यावा . थोडासा दाणेदार व्हायला लागला की गॅस बंद करून खवा एका ताटलीत काढून थंड होऊ द्यावा .
  2. टांगलेले दही चांगले फेटून घ्यावे .
  3. नंतर त्यात दूध , साखर घालून पूर्ण मिसळेपर्यंत एकत्र करावे.
  4. एका मोठ्या ग्लासात कडांनी थोडे रोज किंवा स्ट्रॉबेरी सिरप घालून घ्यावे . दिसायला छान दिसते . ग्लासात पहिल्यांदा दही घालावे , त्यावर खव्याचा थर आणि नंतर सुक्या मेव्याचा असा थर लावून घ्यावा .
  5. असे थर ग्लास पूर्ण भरेपर्यंत अंडी सगळ्यात शेवटचा थर दह्याचा येईल असे भरावेत .
  6. वरून सजावटीसाठी थोडा सुका मेवा घालावा .
  7. लस्सीचे असे भरलेले ग्लास फ्रिजमध्ये थंड होय द्यावेत .
  8. बालगोपाळांना ही लस्सी अतिशय आवडते !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/dry-fruit-lassi-in-marathi/