Masala Appe recipe in Marathi-पालक आणि मिश्र डाळींचे आप्पे
Author: 
Recipe type: Snacks
Cuisine: Indian
 
Ingredients
किती बनतील : ४० -४५
शिजवण्यासाठी वेळ: ८ मिनिटे ( १२ आप्पे )
साहित्य:
  • १ कप = २०० ग्रॅम तांदूळ ( कुठलाही घरातल्या वापराचा ),
  • अर्धा कप = १०० ग्रॅम्स चण्याची डाळ ,
  • पाव कप = ६० ग्रॅम्स उडीद डाळ ,
  • पाव कप = ६० ग्रॅम्स तूर डाळ ,
  • पाव कप = ६० ग्रॅम्स मसूर डाळ ,
  • पाव कप = ६० ग्रॅम्स मूग डाळ ,
  • अर्धा टीस्पून मेथी दाणे ,
  • १ कप = १०० ग्रॅम्स पालकाची पाने स्वच्छ धुऊन , बारीक चिरून ,
  • १ लहान कांदा = ५० ग्रॅम्स बारीक चिरलेला ,
  • ७-८ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या ,
  • १० -१२ कढीपत्ता बारीक चिरलेल्या ,
  • अर्धा टीस्पून जिरे ,
  • अर्धा टीस्पून हिंग ,
  • मीठ चवीपुरते
Instructions
कृती :
  1. सगळ्या डाळी , तांदूळ आणि मेथी दाणे स्वच्छ धुऊन रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे . रात्रभर शक्य नसेल तर किमान ४-५ तासांसाठी भिजवावे . सकाळी पाणी काढून बारीक वाटावे . मी वाटण्यासाठी अर्धा कप पाणी वापरले आहे .
  2. या पेस्टमध्ये पालक , कांदा, हिरव्या मिरच्या , कढीपत्ता , जिरे , आणि हिंग घालीन एकत्र करून घ्यावे .
  3. पाव कप पाणी आणि चवीपुते मीठ घालून पीठ जरासे सरसरीत करावे . खूप पातळ नको . चमच्याने घालता येईल इतके घट्ट ( स्पून ड्रॉप consistency )
  4. आप्पेपात्र माध्यम आचेवर चांगले गरम करून घ्यावे . त्या छिद्रांत तेल घालावे . नंतर मिश्रण या छिद्रांत घालावे . आच मंद करून झाकण घालून शिजू द्यावे .
  5. साधारण ४ मिनिटानंतर खालच्या बाजूने आप्पे हलक्या करड्या रंगावर आले की उलटावे . उलटण्यापूर्वी थोडे तेल वरून घालावे .
  6. दुसऱ्या बाजूने थोडे कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यावेत.
  7. गरमागरम आप्पे चटणीसोबत किंवा टोमॅटो केच अप सोबत वाढावेत.
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/masala-appe-recipe-in-marathi/