Tandlachi Bhakri in Marathi-तांदळाची भाकरी
Author: 
Recipe type: Main
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : १० मिनिटे
बनवण्यासाठी वेळ : १० मिनिटे
साहित्य:
  • २ कप तांदळाचे पीठ - ३०० ग्रॅम्स ( बासमती तुकडा , इंद्रायणी , आंबेमोहोर , कोलम किंवा कोणत्याही लहान दाण्यांचा तांदूळ ) ,
  • २ कप पाणी ( ५०० ml )
  • १ टीस्पून मीठ ,
  • १ टीस्पून तेल
नोट : १ कप = २५० ml
Instructions
कृती:
  1. एका पातेल्यात २ कप पाणी घेऊन उकळत ठेवावे . त्यात मीठ घालावे .
  2. पाणी उकळले की आच मंद करून त्यात तांदळाचे पीठ वैरावे . लगेच चमच्याने ढवळून घ्यावे , गुठळी होऊ देऊ नये.
  3. पीठाने पाणी शोषले की गॅस बंद करावा . पीठ जरासे निवू द्यावे .
  4. साधारण ३० -४० मिनिटानंतर , पीठ कोमट असतानाच मळायला घ्यावे . हाताला जरासे तेल लावून पीठ मळावे .
  5. ज्या आकाराची भाकरी बनवायची त्या आकाराचे गोळे बनवून घ्यावेत .
  6. मध्यम आचेवर तवा गरम करून घ्यावा . पोळपाटावर तांदळाच्या कोरड्या पीठावर भाकरी लाटण्याने पातळ लाटून घ्यावी.
  7. तव्यावर भाकरी घालावी आणि वरून पाण्याचा हात फिरवावा .
  8. खालून भाकरी जराशी भाजली कि उलटावी आणि छान खरपूस भाजून घ्यावी . रुमाल किंवा काविन्त्याने दाबून भाकरी फुलवावी .
  9. अशा प्रकारे सगळ्या भाकऱ्या भाजून घ्याव्यात .
  10. गरम गरम तांदळाची भाकरी आणि कोणतीही उसळ , मच्छीचा रस्सा , चिकन-मटणाचा रस्सा तसेच पालेभाज्यांसोबत अतिशय चविष्ट लागते !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/tandhlachi-bhakri-in-marathi/