Malvani Chicken Curry-Kombdi Vade-कोकणातलो आखाड !
Author: 
Recipe type: Main
Cuisine: Indian
 
Ingredients
किती बनतील: ८-१०
तयारीसाठी वेळ: ३० मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ: १० मिनिटे
साहित्य:
  • १ किलो पिठासाठी:
  • अर्धा किलो लहान दाण्याचा तांदूळ ( कोलम, आंबेमोहोर इत्यादी )
  • १५० ग्रॅम्स उडीद डाळ
  • १०० ग्रॅम्स चण्याची डाळ
  • ४ टेबलस्पून धणे ( २० ग्रॅम्स )
  • पाव टीस्पून ओवा
  • पाव टीस्पून मेथी
  • १ टीस्पून काळी मिरी
  • १ टीस्पून जिरे
  • १ टीस्पून बडीशेप
वड्यांसाठी :
  • १ कप = १५० ग्रॅम्स कोंबडी वडे पीठ
  • पाव कप = ४० ग्रॅम्स गव्हाचे पीठ
  • अर्धा टीस्पून हळद
  • अर्धा टीस्पून मीठ
  • तेल
कोंबडी सागोती-मालवणी चिकन
कितीजणांना पुरेल: ४-५
तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : ५० मिनिटे
साहित्य:
  • १ किलो चिकन - धुऊन, स्वच्छ करून, मध्यम आकाराच्या तुकड्यांत कापून ,
  • १ टीस्पून हळद ,
  • १ इंच आल्याचा तुकडा + ५-६ लसणीच्या पाकळ्या ( आले लसणीची बारीक पेस्ट साधारण दीड ते दोन टेबलस्पून ),
  • अर्धा कप = ५० ग्राम किसलेले सुके खोबरे,
  • अर्धा कप = ५० ग्रॅम्स किसलेलं ओले खोबरे,
  • १०-१२ लसणीच्या पाकळ्या ,
  • १ मोठा कांदा = १०० ग्रॅम्स लांब चिरलेला ,
  • १ कप कोथिंबीर ,
  • अर्धा कप = ५० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे,
  • पाव टीस्पून खसखस,
  • ३-४ लवंग ,
  • दोन लहान जावित्रीच्या पाकळ्या ,
  • ४-५ काळी मिरी,
  • १ इंच दालचिनीचा तुकडा,
  • १ मसाला वेलची ,
  • पाव टीस्पून शहाजिरे ,
  • २ तमालपत्रे .
  • १ लहान कांदा = ५० ग्रॅम्स बारीक चिरलेला ,
  • ५ टेबल्स्पून मालवणी मसाला ( तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार ) ,
  • पाणी गरजेनुसार ,
  • तेल
Instructions
कृती:
  1. सगळे गरम मसाले एका मागून एक मंद आचेवर हलके भाजून घ्यावेत . खूप काळपट रंगावर भाजू नयेत , जरासा सुवास सुटायला लागला कि काढावेत .
  2. थंड झाले की एका डब्यात तांदूळ , ज्वारी, डाळी आणि सगळे मसाले एकत्र करून घ्यावेत .
  3. हे सगळे पीठ चक्कीवरुन जाडसर दळून घ्यावे .
  4. एका मोठ्या खोलगट भांड्यात वड्याचे पीठ , गव्हाचे पीठ , हळद, मीठ आणि १ टीस्पून तेल एकत्र करून घ्यावे . पुरीच्या पीठाप्रमाणे घट्ट मळून घ्यावे . पीठ मळताना त्यात गरम पाण्याचा ( साधारण पाव कप ) वापर करावा. हा पिठाचा गोळा अर्ध्या तासासाठी झाकून ठेवावा .
  5. अर्ध्या तासानंतर पिठाचा गोळा पुन्हा एकदा चांगला दाब देऊन मळून घ्यावा . मोठ्या लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून घ्यावेत .
  6. पोळपाटावर पाण्याने भिजवून घट्ट पिळलेले सुती कापड पसरवून घ्यावे . हाताच्या तळव्याच्या खालील भागाने दाब देत गोल पुऱ्यांचा आकार द्यावा . जरासे वडे जाडसर असू द्यावे.
  7. तेल कढईत मध्यम आचेवर चांगले गरम करून घ्यावे .
  8. एकेक वडा असा बनवून गरम तेलात मंद ते मध्यम आचेवर चांगले दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यत तळावेत .
  9. काळ्या वाटाण्याच्या सांबारासोबत किंवा चिकन , मटणाच्या रश्श्यासोबत अप्रतिम लागतात !
कोंबडी सागोती-मालवणी चिकन
कृती :
  1. एका खोलगट भांड्यात चिकन घेऊन त्यात हळद, आले लसणाची पेस्ट लावून चांगले एकत्र चोळून घ्यावे .
  2. एका कढईत २-३ टेबलस्पून तेल घालून गरम होऊ द्यावे . त्यात चिकन घालून मोठया आचेवर २ मिनिटे परतून घ्यावे .
  3. दोन मिनिटांनंतर मंद आच करून झाकण घालून चिकनला १० मिनिटे स्वतःच्याच पाण्यात शिजू द्यावे . अगदीच गरज लागली तर पाव कप पाणी घालावे .
  4. चिकन शिजतेय तोपर्यंत वाटण बनवून घेऊया . तव्यात मंद आचेवर सुके खोबरे खरपूस भाजून घ्यावे . एका ताटलीत काढून घ्यावे .
  5. त्याच तव्यात २ टेबल्स्पून तेल घालून लसूण परतून घ्यावी . लसूण गुलाबी रंगावर आली कि त्यात कांदा घालावा . चांगला परतून घ्यावा . मग त्यात कोथिंबीर जरा परतून घ्यावी . त्यात ओले खोबरे घालून हलके भाजून घ्यावे , खूप लालसर करू नये . नंतर हा भाजलेला जिन्नस तव्यात एका बाजूला करून मध्ये सगळे खडे गरम मसाले घालावेत आणि साधारण सुगंध येई पर्यंत ३० सेकंड ते १ मिनिट भाजून घ्यावेत . हा भाजका मसाला गॅसवरून उतरवून आता थंड होऊ द्यावा .
  6. एकदा मसाला भाजताना मध्ये चिकन शिजली कि नाही ते पाहूया . १० मिनिटे चिकन ५० टक्क्यांपर्यंत शिजते आणि छान पाणीसुद्धा सोडते . हा स्टॉक अगदी चविष्ट लागतो .
  7. मसाला थंड झाला कि पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये चांगले बारीक वाटून घ्यावे .
  8. कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . तमालपत्र घालावे . बारीक चिरलेला कांदा घालून मऊ होऊ द्यावा . आता मालवणी मसाला घालावा . करपू नये म्हणून १-२ टेबलस्पून पाणी घालावे .
  9. नंतर वाटलेला मसाला घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घयावा . बाहेर उडू नये म्हणून मंद आचेवर झाकण घालून परतून घयावा .
  10. आता शिजलेले चिकन व चिकनचे पाणी घालून नीट मसाल्यात एकत्र करून घ्यावे . ३ कप गरम पाणी घालावे . आणि रस्सा जरा मध्यम आचेवर उकळू द्यावा .
  11. एक उकळी फुटली की आच मंद करून झाकण घालून चिकन पूर्ण शिजू द्यावे .
  12. चवीपुरते मीठ घालावे .
  13. गॅस बंद करावा . मालवणी चिकन रस्सा म्हणजेच कोंबडी सागोती वड्यां सोबत किंवा आंबोळीसोबत वाढावी .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/malvani-chicken-kombdi-vade/