Safed Vatanyachi Usal in Marathi- पांढरा वाटाणा उसळ
Author: 
Recipe type: Main
Cuisine: Indian
 
Ingredients
कितीजणांना पुरेल : ४-५
शिजवण्यासाठी वेळ : ४५ मिनिटे
साहित्य:
 • १ कप = २०० ग्रॅम्स पांढरे वाटाणे , रात्रभर पाण्यात भिजवून
 • १ कप = ८० ग्रॅम्स किसलेले सुके खोबरे
 • दीड इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून ,
 • ८-१० लसणीच्या पाकळ्या ,
 • १ मध्यम आकाराचा कांदा लांब चिरून
 • पाऊण कप कोथिंबीर
 • १ टेबलस्पून चिंच पाव ते अर्धा कप गरम पाण्यात भिजवून
 • २ तमालपत्रे
 • अर्धा इंच दालचिनीचा तुकडा
 • ३ लवंग
 • १ मसाला वेलची
 • १ टीस्पून राई
 • १ टीस्पून जिरे
 • पाव टीस्पून हिंग
 • १ टीस्पून हळद
 • ३ टेबलस्पून मालवणी मसाला ( नसल्यास २ टेबलस्पून काश्मिरी किंवा बेडगी लाल मिरची पूड + १ टेबलस्पून गरम मसाला पावडर )
 • १ टेबलस्पून गूळ
 • मीठ
 • तेल
Instructions
कृती:
 1. पांढरे वाटाणे आपण पातेल्यात शिजवून घेणार आहोत . त्यासाठी ४ ते ५ कप पाणी उकळत ठेवायचे आहे . या पाण्यात रात्रभर भिजवलेले वाटाणे घालून शिजवून घ्यायचे आहेत ( साधारण १५ ते २० मिनिटे ) . असे केल्याने वाटाण्याच्या साली वेगळ्या होत नाहीत आणि वाटाणे न फुटता शिजतात .
 2. मसाल्याच्या वाटणासाठी सुके खोबरे मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावे . एका ताटात काढून घ्यावे .
 3. एका कढईत २-३ टेबलस्पून तेल गरम करून त्यात आल्याचे तुकडे , आणि लसूण घालून परतून घ्यावे . लसूण गुलाबी रंगावर आली की त्यात कांदा घालून चांगला लालसर होईपर्यंत खमंग परतून घयावा .
 4. आता कोथिंबीर घालून चांगली तेलात परतून घ्यावी . नंतर भाजलेले खोबरे फक्त एकत्र करून गॅस बंद करावा . हे सगळे मिश्रण थंड झाले की मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी . वाटताना मी पाऊण कप पाण्याचा वापर केला आहे .
 5. एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून त्यात तमालपत्रे , दालचिनी , लवंगा, मसाला वेलची , मोहरी , जिरे , आणि हिंगाची फोडणी करावी .
 6. नंतर आच मंद करून तेलात हळद नी मालवणी मसाला घालावा . मसाला करपू देऊ नये , त्यासाठी १-२ टेबलस्पून पाणी घालावे . चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा .
 7. आता वाटण घालावे . अर्धा कप पाणी घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे .
 8. नंतर शिजलेले वाटाणे घालून त्यात दीड ते दोन कप पाणी घालून रस्सा तयार करावा . मध्यम आचेवर एक उकळी फुटू द्यावी . नंतर आच मंद करून झाकून ४-५ मिनिटे शिजू द्यावे .
 9. रस्सा जरासा दाटसर झाला की त्यात चिंचेचा गाळून घेतलेला कोळ घालावा , तसेच गूळ आणि चवीपुरते मीठ घालून एकत्र करावे .
 10. २-३ मिनिटांसाठी शिजू द्यावे म्हणजे चिंच गुळाचा स्वाद रश्श्यात उतरतो .
 11. नंतर गॅस बंद करून उसळ झाकून वाढेपर्यंत जरा मुरू द्यावी .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/safed-vatanyachi-usal-in-marathi/