How to sprout Matki in Marathi- मटकीला मोड काढायची सोप्पी पद्धत
Author: Smita Mayekar Singh
Ingredients
साहित्य
२५० ग्रॅम्स मटकी
पाणी
चाळणी
मोठे पातेले
Instructions
कृती:
मटकी भिजवण्याआधी स्वच्छ निवडून घ्यावी . कधी कधी मटकीत बारीक खडे आढळतात . नंतर एका पातेल्यात मटकी स्वच्छ धुऊन ती बुडेल इतके पाणी घालावे . पातेले झाकून ८ ते १० तासांसाठी मटकी भिजू द्यावी .
दहा तासांनी मटकी पाण्यात चांगली भिजून फुगते .
ही मटकी एका चाळणीत काढून तिचे जास्तीचे पाणी खाली निथळू द्यावे.
साधारण १० मिनिटांत पाणी निथळल्यावर अर्धी मटकी एका सुती पातळ कापडात गच्च बांधून गाठोडे बांधावे . हे गाठोडे एका पातेलीत ठेवून वर चलन झाकण ठेवावी म्हणजे हवा खेळती राहते . स्वयंपाकघरात जराशा उबदार जागी २४ तासांसाठी हे पातेले ठेवावे .
मटकीला मोड काढण्याची दुसरी पद्धत ही हिवाळ्यासाठी जास्त उपयोगी आहे . मायक्रोवेव्ह ओव्हन हाय पॉवर वर २ मिनिटे गरम करून घ्यावा . मटकी एका चाळणीत काढून त्याखाली एक पातेले ठेवावे आणि हे पातेले ओव्हन मध्ये ठेवावे . ओव्हनचा मेन स्विच बंद करावा .
२४ तासांनंतर छान मटकीला मोड येतात. आपण त्वरित ही मटकी वापरू शकतो किंवा फ्रिजमध्ये ठेवू शकतो .
फ्रिजमध्ये स्टोर करण्यापूर्वी मटकी पूर्ण कोरडी असावी , ओलसरपणा नसावा . एका प्लॅस्टिकच्या किंवा स्टीलच्या हवाबंद डब्यात किचन वापराचा टिश्यू पेपर पसरवून त्यावर मटकी भरावी . डबा बंद करून फ्रिजमध्ये ठेवावा .
मोड आलेले कडधान्य असे फ्रिजमध्ये १०-१२ दिवस आरामात टिकते. वाटल्यास मध्ये मध्ये टिश्यू पेपर बदलावा . जर हे कडधान्य २ आठवड्यांपेक्षा जास्त दिवस टिकवायचे असेल तर डीप फ्रिजमध्ये ठेवावे .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/how-to-sprout-matki-in-marathi/