Phodnicha Bhaat recipe in Marathi-फोडणीचा भात
Author: 
Recipe type: Main
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : १० मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : १० मिनिटे
कितीजणांना पुरेल : ४-५
साहित्य:
 • २ कप शिजवलेला भात ( ताजा किंवा शिळा )
 • २ लहान कांदे लांब चिरलेले = १०० ग्रॅम्स
 • ४ हिरव्या मिरच्या लांब मधून चिरलेल्या
 • अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर
 • १०-१२ लसूण पाकळ्या सालीसहित
 • तेल
 • १ टीस्पून मोहरी
 • २ टीस्पून जिरे
 • पाव टीस्पून हिंग
 • १ टीस्पून हळद
 • २ टेबलस्पून मालवणी मसाला
 • ८-१० कढीपत्ता
 • मीठ चवीनुसार
Instructions
कृती:
 1. भात एका परातीत किंवा मोठ्या ताटात पसरवून घ्यावा . त्यात हळद, मालवणी मसाला आणि चवीपुरते मीठ घालावे . जर मालवणी मसाला नसेल तर त्याऐवजी ३ टीस्पून काश्मिरी किंवा बेडगी मिरची पावडर आणि २ टीस्पून घरगुती गरम मसाला वापरला तरी चालेल .
 2. एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करावे . त्यात मोहरी तडतडू द्यावी . नंतर जिरे , हिंग घालावे . लसूण पाकळ्या सालीसकट ठेचून घालाव्यात . लसूण जराशी गुलाबी रंगावर आली की हिरव्या मिरच्या , कढीपत्ता आणि कांदा घालून जरासा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यावा .
 3. थोडी कोथिंबीर घालावी आणि परतून घ्यावी .
 4. आता कालवलेला भात आणि चवीपुरते मीठ घालावे . मंद ते मध्यम आचेवर ३-४ मिनिटे भात मसाल्यात चांगला परतून घ्यावा .
 5. वरून कोथिंबीर घालावी . गॅस बंद करावा . आवडत असल्यास जरा वाफ निवल्यावर लिंबू पिळून भात खायला द्यावा सोबत एक आंब्याच्या लोणच्याची फोड किंवा भाजलेला पापड !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/phodnicha-bhaat-recipe-marathi/