Maharashtrian Koshimbir in Marathi- महाराष्ट्रीयन दह्याची कोशिंबीर
Author: 
Cuisine: Indian
Prep time: 
Cook time: 
Total time: 
 
Ingredients
कितीजणांना पुरेल : ४ ते ५
तयारीसाठी वेळ : १० मिनिटे
बनवण्यासाठी वेळ : ५ मिनिटे
साहित्य:
  • २ कप घट्ट दही ( ४०० ग्रॅम )
  • १ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून , ८० ग्रॅम
  • २ मध्यम आकाराच्या काकड्या , बारीक तुकडे करून , १५० ग्रॅम
  • २ मध्यम आकाराचे टोमॅटो , बारीक तुकडे करून , १५० ग्रॅम
  • पाव कप शेंगदाणे , ६० ग्रॅम
  • १ हिरवी मिरची बारीक चिरून
  • मीठ चवीनुसार,
  • १ टीस्पून साखर
  • दीड टीस्पून भाजलेली जिरे पावडर ,
  • पाव कप डाळिंबाचे दाणे ( ऐच्छिक)
Instructions
कृती :
  1. शेंगदाणे मंद आचेवर खरपूस भाजावेत . थंड झाल्यावर त्यांची टरफले काढून खलबत्त्यात कुटून किंवा मिक्सरमधून जाडसर कूट करून घ्यावा .
  2. एका बाऊलमध्ये दही घालून व्यवस्थित फेटून घ्यावे . गुठळी राहू देऊ नये .
  3. दह्यात चिरलेल्या भाज्या , डाळिंबाचे दाणे , साखर , मीठ , जिरे पावडर घालून नीट ढवळून एकत्र करून घ्यावे .
  4. नंतर दाण्याचा कूट घालून एकत्र करून घ्यावा . वरून सजावटीसाठी थोडे डाळिंबाचे दाणे घालावेत .
  5. नंतर ही कोशिंबीर फ्रिजमध्ये ठेवावी , वाढण्यापूर्वी फक्त १५ मिनिटे आधी बाहेर काढावी .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/maharashtrian-koshimbir/