Maharashtrian Batata Bhaji- बटाट्याची सुकी भाजी- Kalimirchbysmita
Author: 
Recipe type: Main
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे
बनवण्यासाठी वेळ : १५ मिनिटे
कितीजणांना पुरेल: ४-५
साहित्य:
 • ८ उकडलेले बटाटे ( ७०० ग्रॅम ) ,
 • २ मोठे कांदे लांब चिरलेले ( २०० ग्रॅम ),
 • ५-६ कढीपत्ता बारीक चिरलेला ,
 • १ इंच आल्याचा तुकडा बारीक चिरलेला ,
 • ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या ,
 • ५-६ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या ,
 • पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर,
 • १ टीस्पून मोहरी ,
 • १ टीस्पून जिरे ,
 • १ टीस्पून उडीद डाळ ,
 • पाव टीस्पून मेथी ,
 • पाव टीस्पून हिंग ,
 • १ टीस्पून हळद ,
 • मीठ चवीनुसार ;
 • अर्धा टीस्पून साखर ,
 • १ लिंबाचा रस,
 • तेल
Instructions
कृती:
 1. प्रेशर कूकरमध्ये बटाटे बुडतील इतके पाणी घालावे . त्यात चांगले १ टेबलस्पून मीठ घालावे ,म्हणजे बटाटे उकडताना पाण्यात फुटत नाहीत . बटाटे उकडल्यावर थंड झाले की सोलावेत आणि त्यांच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्याव्यात .
 2. कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करावे . त्यात मोहरी , जिरे , हिंग , मेथी , उडीद डाळ , चिरलेला कढीपत्ता आणि लसूण घालावी . लसूण जराशी गुलाबी रंगावर परतून घ्यावी .
 3. आता आले घालावे आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यावे . हिरव्या मिरच्या घालून जरा परतून घ्याव्यात . त्यात कांदा घालून जरासा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा .
 4. त्यात हळद घालावी आणि मिनिटभर परतावी . नंतर थोडी चिरलेली कोथिंबीर घालून परतावे . बटाट्याच्या फोडी घालून मध्यम आचेवर एकत्र करून घ्यावे . चवीपुरते मीठ घालावे . मंद आचेवर झाकण घालून २ मिनिटे शिजू द्यावे .
 5. नंतर साखर घालावी . लिंबाचा रस घालून एकत्र ढवळून घ्यावे .
 6. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि गॅस बंद करावा .
 7. स्वादिष्ट बटाट्याची भाजी पोळी , फुलके , पुरींसोबत किंवा वरण भातासोबत वाढावी .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/maharashtrian-batata-bhaji/